शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

India China Face Off: कठोर वाटाघाटीनंतर चीनकडून १० भारतीय जवानांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 05:56 IST

दोन अधिकाऱ्यांचा समावेश; हिंसक झटापटीदरम्यान चिनी सैनिकांनी घेतले होते ताब्यात

नवी दिल्ली : भारत आणि चिनी मुत्सद्दी तसेच सैनिकांच्या माध्यमातून दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये पार पडलेल्या वाटाघाटीच्या तीन फेºयानंतर चीनने भारताच्या १० जवानांना सोडून दिले आहे. दोन्ही बाजूंच्या सैन्यामध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जवानांची सुरक्षा लक्षात घेता या वाटाघाटी अत्यंत गुप्ततेने पार पाडण्यात आल्या. या भारतीय जवानांना १५ जून रोजी गलवान खोºयात झालेल्या हिंसक झटापटीदरम्यान चिनी सैनिकांनी ताब्यात घेतले होते.याबाबत नाव न सांगण्याच्या एका अधिकाºयाने सांगितले की, भारताला परत केलेल्या या १० जवानांमध्ये दोन अधिकाºयांचा समावेश आहे. हिंसक झटापटीनंतर यांना तीन दिवसांनी भारताला सोपविण्यात आले आहे. परंतु याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. भारताने म्हटले होते की, या झटापटीत एकही भारतीय जवान हरवलेला नाही. या १० जवानांना सोडून देण्याआधी झालेल्या वाटाघाटी गलवान खोºयात पेट्रोलिंग पॉइंट १४ येथे पार पडल्या. (वृत्तसंस्था)तीन दिवस झाल्या वाटाघाटीमंगळवार ते गुरुवारपर्यंत चाललेल्या वाटाघाटीत भारताच्या वतीने मेजर जनरल अभिजित बापट आणि याच दर्जाचे चिनी लष्करी अधिकारी सामील झाले. गुरुवारी यांच्यात वाटाघाटीची तिसरी फेरी पार पडली. झालेल्या वाटाघाटी सध्या सैन्य परत घेण्याच्या सुरूअसलेल्या प्रक्रियेचाच एक भाग होत्या. दोन देशांमध्ये सीमांवर झालेल्या वादानंतर मेच्या सुरुवातीपासून हे लष्करी अधिकारी सातव्यांदा भेटत आहेत. सुटका झालेल्या 10 जवानांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. चीनने अद्यापही त्यांच्या सैन्यातील कुणीही ठार झाले किंवा जखमी झाले हे मान्य केलेले नाही. परंतु भारताच्या लष्करी अधिकाºयांनी 43 चिनी सैनिक ठार झाले किंवा गंभीर जखमी झाल्याचा दावा केला आहे. त्याच वेळी भारताचे ७६ जवान जखमी झाल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :chinaचीन