शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

India China Conflict: भारताच्या जवानांनी चिनी सैन्याला लाठ्याकाठ्यांनी हाणले, पळवून लावले; व्हायरल व्हिडीओची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 09:36 IST

India China Conflict: भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये भारताचे शूर जवान मातृभूमीचे रक्षण करताना चिनी सैनिकांना लाठ्याकाठ्यांनी झोडपून काढताना दिसत आहेत. मात्र हा व्हिडीओ जुना आहे असंही अनेकांचं म्हणणं आहे

नवी दिल्ली - आधीच तणावपूर्ण असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अरुणाचल प्रदेशमधील तवांगमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली आहे. या झटापटीत दोन्ही देशांचे जवान जखमी झाले आहे. ९ डिसेंबर रोजी ही हिंसक झटापट झाल्याचे सांगण्यात येत आहे. या मुद्द्यावरून देशातील राजकारण तापले असतानाच या झटापटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये भारताचे शूर जवान मातृभूमीचे रक्षण करताना चिनी सैनिकांना लाठ्याकाठ्यांनी झोडपून काढताना दिसत आहेत. तसेच भारतीय जवानांनी इंगा दाखवल्यानंतर घुसखोर चिनी सैनिकांनी पळ काढल्याची माहिती समोर येत आहे. मात्र हा व्हिडीओ जुना आहे असंही अनेकांचं म्हणणं आहे. 

भारत आणि चीनच्या जवानांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण करण्याचा चीनचा डाव असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या घटनेवरून चिंता व्यक्त होत असतानाच अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या संघर्षाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओला अद्याप लष्कराकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. हा व्हिडीओ जुना असल्याचाही दावा केला जात आहे.  मात्र हा व्हिडीओ धडाक्याने व्हायरल होत आहे. भारताच्या जवानांनी घेतलेल्या रुद्रावतारामुळे घुसखोर चिनी सैनिक बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहेत. तर भारताचे जवान त्यांना बडवून काढताना दिसत आहेत.

दरम्यान, ही घटना ९ डिसेंबरची आहे. माहितीनुसार, सुनियोजित कटाचा भाग म्हणून चीनचे सैन्य ३०० सैनिकांसह यांगत्से भागातील भारतीय चौकी हटवण्यासाठी पोहोचले होते. चिनी सैनिकांकडे लाठ्या-काठ्याही होत्या. मात्र भारतीय जवानांनी तात्काळ मोर्चेबांधणी केली. यानंतर दोन्ही सैन्यात झटापट झाली. भारतीय सैनिकांचं आक्रमक रुप पाहून चिनी सैनिक मागे हटले. चिनी सैनिकांनी दगडफेक केल्याचंही पुढे आले आहे. या संघर्षात दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले. भारताच्या ६ जवानांना उपचारासाठी गुवाहाटी येथे आणण्यात आले आहे.

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत संसदेत निवेदन दिले आहे. त्यात ते म्हणाले की, चिनी सैन्याने ९ डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील यांगत्से भागात घुसखोरीचा प्रयत्न केला, त्याला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर देत माघारी जाण्यास भाग पाडले. या चकमकीत एकाही जवानाचा मृत्यू झाला नाही आणि कोणीही गंभीर जखमी झाले नाही.

तर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे, तोपर्यंत कोणी एक इंच जमिनीवरही अतिक्रमण करू शकत नाही, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला आहे. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndian Armyभारतीय जवानArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशSocial Viralसोशल व्हायरल