शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

डावे संपले तर देश धोक्यात येईल; जयराम रमेश यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 09:35 IST

नुकत्याच झालेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची 25 वर्षांची सत्ता उलथवून ऐतिहासिक यश संपादन केले होते. देशभरातील डाव्या चळवळीसाठी हा खूप मोठा धक्का होता.

तिरुअनंतपुरम: भारतात डाव्या विचारसरणीने खंबीर राहण्याची गरज आहे. त्यांचे अस्तित्त्व संपले तर ते देशासाठी खूप मोठे संकट असेल, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मांडले. ते रविवारी तिरूअनंतपुरम येथील कार्यक्रमात बोलत होते. नुकत्याच झालेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची 25 वर्षांची सत्ता उलथवून ऐतिहासिक यश संपादन केले होते. देशभरातील डाव्या चळवळीसाठी हा खूप मोठा धक्का होता. त्रिपुरातील पराभवामुळे आता भारतात फक्त केरळमध्ये डाव्यांची सत्ता उरली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना जयराम रमेश यांनी म्हटले की, डाव्यांची सद्दी संपणे हा भारतासमोरील सर्वात मोठा धोका आहे. त्यामुळे डाव्या चळवळीने खंबीर राहिले पाहिजे. आम्ही (काँग्रेस) भले एकमेकांचे राजकीय विरोधक असू. मात्र, डाव्यांचा अस्त होणे हे भारताला परवडू शकत नाही. देशासाठी ते खूप मोठे संकट असेल, असे जयराम रमेश यांनी म्हटले. मात्र, याचवेळी जयराम रमेश यांनी डाव्या पक्षांनी बदलण्याची गरजही व्यक्त केली. डाव्यांना त्यांची मानसिकता बदलावीच लागेल. लोकांच्या बदलत्या आकांक्षा आणि समाजातील बदलती परिस्थिती त्यांनी ध्यानात घेतली पाहिजे, असे जयराम रमेश यांनी सांगितले. 

टॅग्स :Tripura Election Results 2018त्रिपुरा निवडणूक निकाल 2018Northeast Election Results 2018ईशान्य भारत निवडणूक निकाल 2018