शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

अशाप्रकारे भारताला टाळता येईल कुलभूषण जाधवांची फाशी

By admin | Updated: April 10, 2017 22:52 IST

पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सोमवारी कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर भारताकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सोमवारी कुलभूषण जाधव यांना  फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर भारताकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.  जाधव यांना फाशी झाल्यास तो हत्येचा पूर्वनियोजित कट ठरेल अशा शब्दात भारताने पाकिस्तानला ठणकावले आहे. भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित यांना बोलावून विरोधाचे पत्र देऊन चांगलेच खडसावले. या पत्रात भारताने कुलभूषण जाधव यांना शिक्षा सुनावली जाताना अनेक कायदेशीर हक्कांची पायमल्ली केल्याचं म्हटलं आहे.  
 
दुसरीकडे, पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर जाधव यांची फाशी रद्द करण्यासाठी आता भारताकडे काय पर्याय आहेत हा मोठा प्रश्न आहे.   
 
काय आहेत पर्याय-
 
-कुलभूषण यांना कायदेशीर मदत न दिल्याचा आरोप भारताने केला आहे. त्यामुळे योग्य ती कायदेशीर मदत मिळाल्यास फाशीच्या शिक्षेविरोधात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो.
 
-ज्याप्रकारे पाकिस्तानने वर्षभराच्या आत खटला चालवत तडकाफडकी फाशीची शिक्षा सुनावली त्यामुळे जाधव यांच्या अनेक कायदेशीर हक्कांची पायमल्ली झाली. हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्थरावर योग्यप्रकारे मांडून आणि संयुक्त राष्ट्रात हा मुद्दा उचलून धरल्यास पाकिस्तानवर दबाव निर्माण होऊ शकतो.
 
-कूटनीतीचा वापर करून पाकिस्तानवर दबाव वाढवण्याचा भारताकडे पर्याय आहे. पाकिस्तानच्या वर्मावर बोट ठेवून कुलभूषण यांना न्याय मिळण्याची अपेक्षा भारत ठेवू शकतो.
 
- याशिवाय सर्वात महत्वाचा पर्याय म्हणजे दोन्ही देशांच्या प्रमुखांनी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करून चर्चा करावी, या मुद्यावरून दोन्ही देशांतील संबंध आणखी ताणले जाऊ नयेत यासाठी जाधव यांची फाशी रद्द करण्याचा निर्णय होऊ शकतो.