शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर प्रश्नात इतर देशांनी नाक खुपसू नये, भारताने चीनला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 01:39 IST

क्षी जिनपिंग ११ आॅक्टोबरपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत असून तामिळनाडूमधील मामल्लपुरम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत. 

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून आमच्या अंतर्गत बाबींमध्ये इतर देशांनी नाक खुपसायची काहीही गरज नाही, असा इशारा भारताने दिला आहे. काश्मीरमधील स्थितीवर आमचे बारीक लक्ष असून पाकिस्तानसाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींना चीनचा पाठिंबा राहील, असे क्षी जिनपिंग यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी बुधवारी झालेल्या बैठकीत म्हटले होते. त्या उद्गारांवर भारताने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.क्षी जिनपिंग ११ आॅक्टोबरपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत असून तामिळनाडूमधील मामल्लपुरम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्याशी चर्चा करणार आहेत. असे असतानाही काश्मीरच्या विषयावरून भारताने चीनला फटकारले आहे.यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितले की, इम्रान खान व क्षी जिनपिंग यांच्या बैठकीत काश्मीर प्रश्नावर चर्चा झाल्याच्या बातम्या वाचनात आल्या. जम्मू-काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग असून आमची ही भूमिका चीनला नीट माहिती आहे. काश्मीरच्या प्रश्नात इतर देशांनी हस्तक्षेप करण्याचे काहीही कारण नाही.इम्रान खान यांना सल्लाजम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम भारताने ५ आॅगस्ट रोजी रद्द केले. त्यामुळे संतापलेल्या पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरोधात केलेल्या अपप्रचाराला प्रमुख देशांनी अजिबात महत्त्व दिले नाही. संयुक्त राष्ट्रांमध्येही पाकिस्तानने काश्मीरबाबत मांडलेल्या मुद्द्यांची फारशी कोणी दखल घेतली नाही.पाकिस्तान व चीनमध्ये उत्तम संबंध असल्याने काश्मीरबाबत चीन आपल्याला पाठिंबा देईल अशी अटकळ बांधून इम्रान खान यांनी क्षी जिनपिंग यांच्याकडे बुधवारी तो विषय काढला. त्यावेळी पाकिस्तानला जिनपिंग यांनी चुचकारलेच, मात्र काश्मीर प्रश्न भारत व पाकिस्तानने चर्चेच्या माध्यमातूनच सोडवावा असा सल्ला इम्रान खान यांना द्यायलाही ते विसरले नाहीत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरchinaचीनPakistanपाकिस्तानIndiaभारत