शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 08:10 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी; हवामान बदलासंदर्भातही ठोस कृती; विकसित भारत घडविण्याकडे वाटचाल

नवी दिल्ली : भाजपप्रणित एनडीए सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात भारताने केवळ सर्वाधिक वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेली नाही, तर हवामान बदलासंदर्भात ठोस कृती करण्यासारख्या महत्त्वपूर्ण जागतिक प्रश्नांवरही प्रभावी कामगिरी केली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

या  सरकारला सत्तेवर येऊन सोमवारी ११ वर्षे पूर्ण झाली. त्याबद्दल मोदी म्हणाले की, केंद्र सरकारने सामाजिक न्याय देण्यासाठी सर्व प्रयत्न केले आहेत.  वंचित समूहांचे इतक्या प्रमाणात प्रतिनिधीत्व आजवर कधीही केंद्रीय मंत्रिमंडळात दिसले नव्हते.

एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

मोदी यांनी लिहिले आहे की, १४० कोटी भारतीयांच्या आशीर्वादाने आणि सामूहिक सहभागातून भारताने गेल्या ११ वर्षांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये झपाट्याने प्रगती केली आहे. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’ या तत्त्वानुसार सरकारने अनेक मूलगामी बदल घडवून आणले. त्यात आर्थिक प्रगतीपासून ते सामाजिक उत्थानापर्यंत या सरकारने अनेक उत्तम कामे केली. तसेच, विकसित भारत घडविण्याच्या दृष्टीने आता आम्ही पावले उचलली आहेत.

कार्यकाळाची इतिहासात नोंद होणार सुवर्णाक्षरांनी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या ११ वर्षांत देशात घडविलेल्या सकारात्मक बदलांमुळे या कार्यकाळाची नोंद इतिहासात सुवर्णाक्षरांनी केली जाईल, असे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारला लोकाभिमुख बनविले. भाजपला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर बहुमत मिळविण्याइतक्या जागा जिंकता आल्या नाहीत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित भारताची’ पायाभरणी झाली असे ते म्हणाले.

११ वर्षांत मोदी सरकारने नेमके काय केले?

८१ कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य मिळत आहे.

१५ कोटींहून अधिक घरांमध्ये नळाने पाणी पोहोचले आह;.

४ कोटी घरे गरिबांसाठी घरे बांधण्यात आली.

१२ कोटी स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत.

६८ लाख फेरीवाल्यांना कर्ज मिळाले.

५२.५ कोटी लघुउद्योजकांना कर्जवाटप झाले आहे.

२० कोटी महिलांना विविध योजनांतर्गत रोख स्वरूपात कोरोना काळात मदत करण्यात आली.

१२.७५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कर.

२०१४ मध्ये देशात आली होती शिथिलता, पण...

मोदी सरकारने जनहितासाठी काम केले. भारत आपले सार्वभौमत्व व सीमेच्या रक्षणासाठी सज्ज असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे.

लोक जनशक्ती पार्टीचे नेते  चिराग पासवान यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत सांगितले की, देशाने नव्या आर्थिक पुनरुत्थानाच्या, सामाजिक न्यायाच्या युगात प्रवेश केला आहे.

२०१४ मध्ये देशात सर्व बाबतीत शिथिलता आली होती. मोदींच्या नेतृत्वाखालील भारत ‘सुधारणा, कार्यक्षमता आणि परिवर्तन’ या त्रिसूत्रीच्या बळावर आत्मनिर्भरता आणि विकासाकडे वेगाने वाटचाल करत

आहे, असे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी