शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 13:04 IST

India-America: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंत्रिमंडळ बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या ५० टक्के कर आकारणीबाबत चर्चा करतील.

India-America: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक घेणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर लावलेल्या ५० टक्के अतिरिक्त शुल्काच्या निर्णयानंतर दोन्ही देशांमधील व्यापार संबंध तणावाच्या स्थितीत आले आहेत. अशा पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची बैठक महत्वाची मानली जात आहे. अमेरिकेच्या कारवाईला भारताच्या धोरणात्मक प्रतिसादावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

ट्रम्प यांची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय वस्तुंवर २५ टक्के कर लावला होता. तसेच, रशियाकडून तेली खरेदी न करण्याचा इशाराही दिला होता. मात्र, भारताने अमेरिकेच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ट्रम्प यांनी भारतीय मालावर अतिरिक्त २५ टक्के कर लादला. अशाप्रकारे अमेरिकेने भारतावर एकूण ५० टक्के कर लादला आहे. दरम्यान, अमेरिकेच्या या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना परराष्ट्र मंत्रालयाने हा निर्णय अन्याय्य आणि अविचारी असल्याचे म्हटले आहे. 

नवीन शुल्क लागू झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रियातसेच, गुरुवारी दिल्ली येथे एमएस स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलतानाही पंतप्रधान मोदी म्हणाले की, शेतकऱ्यांचे हित हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भारत कधीही आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांच्या हिताशी तडजोड करणार नाही. मला माहित आहे की, यासाठी मला वैयक्तिकरित्या खूप मोठी किंमत मोजावी लागेल, परंतु मी तयार आहे, असे पीएम मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारतAmericaअमेरिकाbusinessव्यवसाय