शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१४ टीव्ही अँकरवर इंडिया आघाडीचा बहिष्कार, कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार नाहीत नेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 06:44 IST

INDIA Alliance Boycotts 14 TV Anchors: रोज संध्याकाळी पाच वाजल्यापासून कोणत्या ना कोणत्या चॅनलवर द्वेषाची दुकाने सजली जातात. आम्ही या द्वेषाच्या बाजाराचे ग्राहक बनणार नाही, असे म्हणत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने गुरुवारी माध्यमांशी संबंधित महत्त्वाचा निर्णय घेतला.

- आदेश रावलनवी दिल्ली  - रोज संध्याकाळी पाच वाजल्यापासून कोणत्या ना कोणत्या चॅनलवर द्वेषाची दुकाने सजली जातात. आम्ही या द्वेषाच्या बाजाराचे ग्राहक बनणार नाही, असे म्हणत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने गुरुवारी माध्यमांशी संबंधित महत्त्वाचा निर्णय घेतला. मंगळवारी समन्वय समितीने म्हटले होते की, गुरुवारी मीडिया कमिटीची बैठक होईल. आज या कमिटीने राष्ट्रीय न्यूज चॅनलशी संबंधित १४ अँकरवर बहिष्कार घातला. 

विरोधकांच्या २६ पक्षांचे प्रवक्ते या अँकरच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार नाहीत. एक समिती गठित करण्यात आली होती. तिने या अँकरच्या जुन्या कार्यक्रमांबाबत एक अहवाल तयार केला होता. समन्वय समितीच्या बैठकीत यावर चर्चाही झाली होती. काँग्रेसने आधीपासूनच रिपब्लिक व टाइम्स नाऊ चॅनलवर प्रतिबंध घातला आहे. यापुढे निर्णय घ्यावा लागला तर ११ राज्यांत जिथे विरोधकांचे सरकार आहे तिथे या सर्व चॅनलच्या जाहिरातींवर रोख लावण्यावरही विचार सुरू आहे.

ते नेमके कोण?टीव्ही १८चे अमन चोपडा, अमिश देवगन, आनंद नरसिंहन, इंडिया टीव्ही- प्राची पाराशर, भारत समाचार-रूबिका लियाकत, आज तक-चित्रा त्रिपाठी, सुधीर चौधरी, गौरव सावंत, शिव अरूर, टाइम्स नाऊ-नाविका कुमार, सुशांत सिंह, भारत एक्स्प्रेस-आदिती त्यागी, दूरदर्शन-अशोक श्रीवास्तव व रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णव गोस्वामी.

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीMediaमाध्यमे