शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

चीन-पाकिस्तानला भरणार धडकी! भारत खरेदी करणार ९७ ड्रोन, १० हजार कोटींची डील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 10:03 IST

आता चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी भारत आपली निगराणी यंत्रणा मोठ्या प्रमाणावर मजबूत करणार आहे. 

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांत भारताचे लष्करी सामर्थ्य खूप वाढले आहे. ते आणखी बळकट करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपूर्वी भारताने फ्रान्सकडून २६ राफेल लढाऊ विमाने आणि ३ स्कॉर्पिन पाणबुड्या खरेदी करण्यासंदर्भात करार केला. यासंदर्भात भारत सरकारने शनिवारी (१५ जुलै)  घोषणा केली होती. दरम्यान, आता चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी भारत आपली निगराणी यंत्रणा मोठ्या प्रमाणावर मजबूत करणार आहे. 

सोमवारी सरकारी सूत्रांनी सांगितले की, भारतीय संरक्षण दलाला चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी ९७ 'मेड-इन-इंडिया' ड्रोन मिळणार आहेत. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दल या ड्रोनसाठी १०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करणार आहे. हे ड्रोन सतत ३० तास  उड्डाण करण्यास सक्षम असतील.

भारताने अलीकडेच अमेरिकेकडून ३१ प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारी सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, सुरक्षा दलांनी संयुक्तपणे वैज्ञानिक अभ्यास केला. यानंतर जमीन आणि समुद्र या दोन्ही ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी ९७ मध्यम उंचीच्या ड्रोनची आवश्यकता भासणार असल्यामुळे हा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि मूळ उपकरणे निर्माते संयुक्तपणे 'मेक-इन इंडिया'च्या माध्यमातून जुने ड्रोन अपग्रेड करत आहेत.

दरम्यान, १० हजार कोटींहून अधिक खर्च करून खरेदी केले जाणारे, हे ड्रोन गेल्या काही वर्षांपासून तिन्ही सैन्यात समाविष्ट असलेल्या हेरॉन यूएव्हीपेक्षा वेगळे असतील. अगोदरच सेवेत असलेले ड्रोन हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मेक-इन-इंडियाच्या माध्यमातून मूळ उपकरण उत्पादकांच्या भागीदारीत अपग्रेड करत आहेत. जिथे त्यांना ६० टक्क्यांहून अधिक भारतीय सामग्री वापरून देशात त्यांची क्षमता वाढवायची आहे.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलIndian Armyभारतीय जवान