शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

स्वातंत्र्य दिन

By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST

सेंट लॉरेन्स हायस्कूल

सेंट लॉरेन्स हायस्कूल
सिडको : येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल व्ही. जे. दत्ता उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थी वाद्यवृंद गटाने व उपस्थितांनी राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली.
अल्पसंख्याक सेल
नाशिक : नाशिक शहर व जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेसच्या वतीने कथाडा येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी शरद अहेर यांनी ध्वजवंदन करून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. यावेळी सुमन नाईक मनपा शाळा, कथडा या शाळेचे शिक्षकवृंद व विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी समूहगीत म्हटले. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी शरद अहेर, हनिफ बशीर शेख, शोभा बच्छाव, वत्सला खैरे, हेमलता पाटील, शाहू खैरे, जावेद इब्राहिम, राजेंद्र बागुल, लक्ष्मण मंडाले, माजी खासदार डॉ. प्रतापराव वाघ आदि उपस्थित होते.
फ्रावशी अकॅडमी
नाशिक : संस्थेचे अध्यक्ष रतन लथ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, पालक व शाळेच्या बँड पथकाने ध्वजास मानवंदना देऊन राष्ट्रगीत म्हटले.
महात्मा गांधी प्राथमिक विद्यामंदिर
नाशिक : जनता सेवा मंडळ संचलित महात्मा गांधी प्राथमिक विद्यामंदिर व पंचवटी माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गं. पां. माने, संचालक सुनंदा माने, ॲड. सुरेश आव्हाड, ॲड. अमोल घुगे, परिसरातील मान्यवर, पालक, नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक आव्हाड यांनी केले. मुख्याध्यापक जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
के.बी.एच. हायस्कूल गिरणारे
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाजाचे के.बी.एच. हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय गिरणारे येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. शालेय माध्यमिक समितीचे अध्यक्ष निवृत्ती पाटील घुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. माध्यमिक समितीचे अध्यक्ष माधवराव पाटील थेटे यांच्या हस्ते स्काउटचे ध्वजारोहण झाले. प्रास्ताविक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुनीता पाटील यांनी केले. व्यासपीठावर पुंडलिक थेटे, विजू थेटे, श्यामराव गायकर, रतन थेटे, साहेबराव थेटे, नामदेव गायकर, तानाजी थेटे, भारत ढिकले, अविनाश पाटील, श्याम थेटे, सरपंच दौलत निंबेकर, उपसरपंच मिलिंद थेटे, गिरणारे केंद्राचे केंद्रप्रमुख कोठावदे उपस्थित होते. सूत्रसंचालन वैशाली पवार, सुरेखा पवार यांनी केले, तर चंद्रकांत पवार यांनी आभार मानले.
न्यू ईरा इंग्लिश स्कूल
नाशिक : न्यू ईरा इंग्रजी शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रशासकीय अधिकारी उमेश डोंगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी नाटक, नृत्य, गाणी यांसारखे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी एकजुटीची भावना, सांस्कृतिक विविधता, देशभक्ती आणि सामाजिक जाणिवा याविषयीचा संदेश दिला.
मनपा शाळा क्र. ६६
नाशिक : जैन सोशल ग्रुप सेंट्रलतर्फे मनपा शाळा क्र. ६६ मोटकरवाडी येथे सुभाष भंडारी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कार्यक्रमास नगरसेवक सुनीता मोटकरी, सुजाता डेरे उपस्थित होते. जेएसजी सेंट्रलतर्फे विद्यार्थ्यांना ज्ञानवृद्धीसाठी पुस्तकांचे वाटप करण्यात आले.