शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

एका रात्रीत नशीब पालटले, तब्बल १४४८ कोटींचे मालक झाले; पण एका चुकीमुळे हात रिकामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 15:46 IST

एका रात्रीत कोट्यधीश झालेल्या व्यक्तीची गोष्ट; पण आता कागदपत्रांत सगळ्याच गोष्टी अडकल्या

कोच्ची: कोणाचं नशीब कसं आणि केव्हा बदलेल सांगता येत नाही. एका क्षणात रावाचा रंक होऊ शकतो. कधीकधी क्षणात आयुष्य बदलून जातं. सर्वसामान्य आयुष्य जगत असलेली माणूस कोट्यधीश होते. केरळच्या कोच्चीत राहणाऱ्या बाबू जॉर्ज वालावी यांच्यासोबत असाच प्रकार घडला आहे. बाबू एका रात्रीत कोट्यधीश झाले. मात्र आता एका चुकीमुळे त्यांना त्यांचं पैसे मिळण्यात अडथळे येत आहेत.

कोच्चीत वास्तव्यास असलेल्या बाबू जॉर्ज वालावी यांनी ४३ वर्षांपूर्वी ३५०० शेअर्स खरेदी केले. ही गुंतवणूक ते कालांतरानं विसरले. आता त्या शेअर्सची किंमत तब्बल १४४८ कोटींच्या घरात गेली आहे. जॉर्ज आता ७४ वर्षांचे असून कोट्यवधी रुपये मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. '१९७८ मध्ये मी मेवाड ऑईल अँड जनरल मिल्स लिमिटेडचे ३५०० शेअर्स खरेदी केले. त्यावेळी राजस्थानच्या उदयपूरमध्ये असलेल्या कंपनीची शेअर बाजारात नोंद नव्हती. ३५०० शेअर्स खरेदी केल्यानं माझी भागिदारी २.८ टक्के होती,' असं बाबू यांनी सांगितलं.बघा, आम्ही मरतोय! दोन मुलांना फासाला लटकवून बापानं नातेवाईकांना पाठवला व्हिडीओ

'त्यावेळी पी. पी. सिंघल कंपनीचे मालक होते आणि ते माझे मित्र होते. कंपनीची शेअर बाजारात नोंद नसल्यानं डिव्हिडंट मिळत नव्हता. त्यामुळे ही गुंतवणूक माझ्यासह कुटुंबाच्या लक्षात राहिली नाही. २०१५ मध्ये आम्हाला अचानक याची आठवण झाली आणि आम्ही पडताळणी सुरू केली. कंपनीचं नाव बदलण्यात आलं असून ते पीआय इंडस्ट्रीज करण्यात आल्याचं आम्हाला समजलं. कंपनीची शेअर बाजारात नोंद असल्याची माहितीदेखील मिळाली,' असं बाबू यांनी सांगितलं. 

कंपनीनं चुकीच्या पद्धतीनं बोगस कागदपत्रांचा वापर करून आपले शेअर्स विकल्याचा आरोप त्यांनी केला. तुमचा आता कंपनीत कोणताही हिस्सा नाही. तुमचे शेअर्स १९८९ मध्ये दुसऱ्या व्यक्तीला विकण्यात आले, अशी माहिती कंपनीनं त्यांना दिली. यानंतर २०१६ मध्ये पीआय इंडस्ट्रीजनं बाबू यांना मध्यस्थीसाठी दिल्लीला बोलावलं. मात्र बाबूंनी मध्यस्थीस नकार दिला. कंपनीनं बाबूंकडे असणाऱ्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी दोन मोठे अधिकारी केरळला पाठवले. बाबू यांच्याकडे असलेली कागदपत्रं खरी असल्याचं कंपनीनं मान्य केलं. मात्र कंपनी बाबू यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे बाबू यांनी सेबीचा दरवाजा ठोठावला आहे.