शहरं
Join us  
Trending Stories
1
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
2
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
3
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
4
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
5
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
6
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
7
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
8
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
9
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
10
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
11
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
12
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
14
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
15
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
16
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
17
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
18
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
19
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
20
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला

अयोध्येत सुरक्षा वाढवली; ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 06:31 IST

बाबरी मशीद पतन दिनाच्या ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत सुरक्षा वाढविण्यात आली आहे

अयोध्या : बाबरी मशीद पतन दिनाच्या ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत सुरक्षा वाढविण्यात आली आहे. विशेषत: रामजन्मभूमी परिसरातील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अनुज कुमार झा यांनी दिली.अनुज कुमार झा म्हणाले की, शांतता आणि सद्भाव कायम ठेवणे याकडे आम्ही लक्ष देत आहोत. अयोध्येतील नागरिक परिपक्वता दाखवून शांतता राखतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अयोध्येतील सुरक्षा चार पातळीवर ठेवण्यात आली आहे. रेड झोनमध्ये २.७७ एकर जागेचा समावेश आहे. यलो झोनमध्ये शहर आणि ग्रीन झोनमध्ये जिल्हा व ब्लू झोनमध्ये शेजारील परिसर यांचा समावेश आहे.सर्वोच्च न्यायालयाने मागील आठवड्यात रामजन्मभूमीबाबत निर्णय दिलेला आहे. रामजन्मभूमी परिसरात हजारो भक्त दर्शनासाठी येतात त्यामुळे या भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात २८ डिसेंबरपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी झा म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येतील लोकांनी अत्यंत परिपक्वता दाखवून शांतता राखली.अयोध्येतील परिस्थितीवर सुरक्षा जवान लक्ष ठेवून आहेत. सोशल मीडियातील हालचालींवर पोलीस निगराणी करत आहेत. शहरातील हनुमान गढी, कनक भवन, दशरथ महाल आदी ठिकाणी ४५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर