शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या सर्व सीमा केंद्रांवर सुरक्षेत वाढ; ५० हजार शेतकरी दिल्लीत येण्याच्या तयारीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 06:03 IST

farmers : गेल्या सहा महिन्यांपासून दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमांवर शेतकरी तीन नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करीत आहेत.

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी शेजारच्या हरयाणा आणि उत्तर प्रदेश राज्यांशी जोडणाऱ्या सर्व सीमा केंद्रांवर गुरुवारी सुरक्षा वाढवली. सुमारे ५० हजार शेतकरी राजधानी दिल्लीत येण्याची योजना तयार करीत असल्याची गुप्तचरांकडून माहिती मिळाल्यानंतर ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अशी कोणतीच योजना नसल्याचे शेतकऱ्यांच्या संघटनांनी म्हटले. 

वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले, “शेतकऱ्यांच्या संघटनांपैकी एका संघटनेने पानीपत टोल प्लाझा येथून सिंघू सीमेवर यावे, असे आवाहन शेतकऱ्यांना केल्याचे आम्हाला समजले आहे. त्यांच्या फलकांवरही दिल्लीला जात असल्याचा उल्लेख आहे. सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या आंदोलनाच्या ठिकाणांसह सगळ्या सीमा केंद्रांवर आमचे कर्मचारी २४ तास कर्तव्य बजावत आहेत; परंतु आवाहनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही वेगवेगळ्या सीमा केंद्रांवर आमचे अस्तित्व बळकट केले आहे.”

गेल्या सहा महिन्यांपासून दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमांवर शेतकरी तीन नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करीत आहेत.

... तर कठोर कारवाई करणार-    जिल्हा पोलीस उप आयुक्तांनी सर्व व्यवस्थेची पाहणी केली. त्यांना परिस्थिती शांततापूर्ण असल्याचे आढळले. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना अनेक स्थरांच्या बॅरिकेडससह सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यास सांगण्यात आले आहे. -    आम्ही त्यांच्याशी समन्वय राखून असून जर कोणी कायदा हाती घेणार असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांना कळ‌वण्यात आले आहे, असे हा अधिकारी म्हणाला.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्ली