शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! बालकांमध्ये श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ; ग्रामीण भागात प्रमाण जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 06:48 IST

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, ८४ टक्के बालकांवर उपचार करण्यात आले. अतिसार झालेल्या बालकांचे प्रमाण ८.५ टक्क्यांवरून ८.९ टक्के वाढले आहे.

मुंबई : राज्यात पाच वर्षांखालील बालकांमध्ये श्वसनाच्या आजारांचे प्रमाण २.४ टक्क्यांवरून ३.२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. विशेष म्हणजे, हे प्रमाण ग्रामीण भागात अधिक आहे. या बालकांना ताप किंवा अन्य लक्षणे असूनही केवळ ७७ टक्के बालकांनाच उपचारांसाठी नेले होते.राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, ८४ टक्के बालकांवर उपचार करण्यात आले. अतिसार झालेल्या बालकांचे प्रमाण ८.५ टक्क्यांवरून ८.९ टक्के वाढले आहे. या बालकांना उपचारांसाठी नेण्याच्या प्रमाणातही घट झाली आहे. यातील ७२ टक्के बालकांना उपचारांसाठी नेण्यात आले होते, तर एनएफएचएस-४ मध्ये हे प्रमाण ७७ टक्के होते. ग्रामीण भागातील बालकांमध्ये अतिसाराचे प्रमाण जास्त (१०.७ टक्के) आहे. बालकांच्या आरोग्याशी निगडित समस्यांकडे काहीशी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.अहवालातील निरीक्षणांनुसार बालकांमध्ये अतिस्थूलतेचे प्रमाणही वाढले आहे. हे प्रमाण चार वर्षांपूर्वी १.९ टक्के होते. यंदाच्या अहवालात हे चार टक्क्यांवर येऊन पोहोचले आहे. सर्वाधिक स्थूल बालके शहरात ५.२ टक्के आढळली असून त्याखालोखाल ३.४ टक्के ग्रामीण भागात आढळली आहेत. तर दुसरीकडे रक्तक्षय झालेल्या बालकांचे प्रमाण ५३.८ टक्क्यांवरून ६८.९ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. ग्रामीणमधील बालकांमध्ये हे प्रमाण ७० टक्के आहे, तर शहरी भागात ६६.३ टक्के नोंदले आहे.बदलत्या ऋतुमानासह प्रदूषण कारणीभूतकोरोना महामारी, हवामानातील तीव्र बदल, हवेचा खालावलेला दर्जा आणि प्रदूषणात होणारी वाढ यामुळे श्वसनाच्या विकारांत वाढ होताना दिसत आहे. याविषयी अधिक खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.- डॉ. अशोक ठाकूर, चेस्ट फिजिशिअनबालमृत्यूंत किंचित घट  एक आणि पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूच्या प्रमाणात अनुक्रमे ०.५ व ०.७ टक्क्यांनी  किंचित घट नोंदविण्यात आली असली तरी नवजात बालकांचा मृत्युदर मात्र १६.२ वरून १६.५ इतका वाढला आहे.  अहवालानुसार, आरोग्य विम्याचे संरक्षण असणाऱ्यांचे प्रमाण १५ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत वाढले आहे.  ग्रामीण भागात १३.८ टक्के लाभार्थ्यांचे प्रमाण १९.९ टक्क्यांपर्यंत तर शहरातही १६ वरून २० टक्क्यांपर्यंत वाढले आहे.