शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

ओबीसींचं आरक्षण २३ टक्क्यांवरुन ४२ % करु; राहुल गांधीचं जाहीर सभेत आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 20:00 IST

छत्तीसगडमधील बेमेतरा येथील प्रचारसभेत बोलताना राहुल गांधींनी जातनिहाय जनगणना आणि त्याचे फायदे सांगितले होते

राज्यात आरक्षणचा मुद्दा ऐरणीवर आला असताना देशातील ५ राज्यांत होत असलेल्या निवडणुकांमध्येही आरक्षण आणि जातनिहाय जनगणना हा प्रमुख मुद्दा ठरत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आपल्या प्रचार सभांतून आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करत आहेत. तसेच, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नागरिकांसाठी गॅरंटी म्हणून अनेक योजनांची घोषणाही केली जात आहे. राहुल गांधींनी तेलंगणातील प्रचार सभेत बोलताना आज पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. तसेच, ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण वाढविण्याची घोषणाच त्यांनी केली. तत्पूर्वी त्यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही एका प्रचारसभेत बोलून दाखवला होता.  

छत्तीसगडमधील बेमेतरा येथील प्रचारसभेत बोलताना राहुल गांधींनी जातनिहाय जनगणना आणि त्याचे फायदे सांगितले होते. जातनिहाय जणगणनेचा निर्णय ऐतिहासिक असेल. त्यामुळे संपूर्ण देशाचे चित्र बदलून जाईल. यामुळे देशातील ओबीसी आणि गरिबांना त्यांच्या खऱ्या लोकसंख्येविषयी माहिती मिळेल. त्यांना त्यांची शक्ती कळेल. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा हा सर्वांत क्रांतिकारी निर्णय असेल, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेचे जोरदार समर्थन केले होते. आता, तेलंगणातील प्रचारसभेत त्यांनी ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण वाढवून देण्याची घोषणा केली आहे. 

राहुल गांधींनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यावर जोरदार टीका केली. केसीआर यांनी जेवढा पैसा चोरी केलाय, तोच पैसा आम्ही गरिबांच्या हितासाठी वापरणार, असे राहुल यांनी म्हटले. यावेळी, राज्यात काँग्रेसचं सरकार आल्यास महिलांना दरमहा २५०० रुपये आणि कॉलेज विद्यार्थ्यांना ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली. तसेच, घर बांधण्यासाठीही ५ लाख रुपये देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. शेतकऱ्यांना १५ हजार वार्षिक, २०० युनिट वीज मोफत आणि ४ हजार मासिक पेन्शन देण्याचीही घोषणा केली. यावेळी, आरक्षणावरही भाष्य केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे आरक्षण २३ टक्क्यांवरुन ४२ टक्क्यांपर्यंत वाढवणार असल्याची घोषणाच राहुल गांधींनी केली. येथे काँग्रेसने तेलंगणातील जनतेला ६ गॅरंटी दिल्या आहेत. तसेच, बीआरएसवर निशाणा साधताना बीआरएसची एकच गॅरंटी आहे ती म्हणजे गरिबांची लूट, असेही त्यांनी म्हटले.  

काँग्रेसची सत्ता आल्यास जातनिहाय जनगणना

छत्तीसगडमध्ये राहुल गांधी असेही म्हणाले होते की, नरेंद्र मोदी हे जातनिहाय जनगणना करतील किंवा करणार नाहीत; परंतु, छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता पुन्हा आल्यास सर्वप्रथम जातनिहाय जनगणनेच्या निर्णयावर सही केली जाईल. यातूनच गरिबांना त्यांची ताकद समजणार आहे. तुमच्यासोबत राहून तुमच्यासाठी काँग्रेस पक्ष हा निर्णय घेणार आहे. आता कोणतीही शक्ती आम्हाला यापासून अडवू शकणार  नाही. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षणElectionनिवडणूक