सभेत गाजणार करवाढ
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
विरोधक आक्र मक : सत्तापक्षातही नाराजीनागपूर : प्रस्तावित मालमत्ता करवाढीला विरोधी पक्षाने विरोध दर्शविला असतानाच सत्तापक्षातील काही सदस्यांचाही याला विरोध आहे. त्यामुळे सोमवारी होणारी महापालिके ची आमसभा चांगलीच वादळी ठरणार आहे. प्रस्तावित करवाढीला विरोध दर्शविण्यासाठी काँग्रेसतर्फे महाल येथील मनपाच्या टाऊ न हॉलपुढे निदर्शने केली ...
सभेत गाजणार करवाढ
विरोधक आक्र मक : सत्तापक्षातही नाराजीनागपूर : प्रस्तावित मालमत्ता करवाढीला विरोधी पक्षाने विरोध दर्शविला असतानाच सत्तापक्षातील काही सदस्यांचाही याला विरोध आहे. त्यामुळे सोमवारी होणारी महापालिके ची आमसभा चांगलीच वादळी ठरणार आहे. प्रस्तावित करवाढीला विरोध दर्शविण्यासाठी काँग्रेसतर्फे महाल येथील मनपाच्या टाऊ न हॉलपुढे निदर्शने केली जाणार आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस व बसपाचे सदस्य सहभागी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेत असताना भाजपने रेडिरेकनरच्या निकषावर करवाढ करण्याला विरोध दर्शविला होता. या विरोधात आंदोलनही केले होते. विरोधामुळे करवाढीला स्थगिती देण्यात आली होती. परंतु आता नागपूर शहर विकास आघाडी रेडिरेकनरचा निकष गृहीत धरून करवाढ करण्याच्या विचारात आहे. सामान्य करात ४ ते १२ टक्के दरवाढ प्रस्तावित आहे. तसेच मलजल लाभकर, पाणी लाभकर व रस्ता कराची प्रत्येकी ३ टक्के वाढ केली जाणार आहे. सर्व विभागाची एकत्रित करवाढ ४० टक्केपर्यत जाणार आहे. गेल्या आमसभेत तीन अभियंत्यांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव न पुकारता मंजूर करण्यात आला होता. यावरून महापौर प्रवीण दटके यांना कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. प्रफुल्ल गुडधे यांनी महापौरांना पत्र लिहून त्यांचा राजीनामा मागितला असून सचिव हरीश दुबे यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.(प्रतिनिधी)