जात प्रमाणपत्र पडताळणी सेवा शुल्कात वाढ
By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST
जात प्रमाणपत्र पडताळणी सेवाशुल्कात वाढ नागपूर : जात प्रमाणपत्र पडताळणीकरिता अर्ज सादर करताना येत्या १ सप्टेबरपासून सुधारित दराने सेवा शुल्क आकारण्याचे आदेश बार्टीकडून सर्व जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना प्राप्त झाले आहेत. त्यानुसार नागपूरला विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक ३ येथील नागरी सुविधा केंद्रात जात प्रमाणपत्र पडताळणीकरिता अर्ज स्वीकारताना विद्यार्थी ...
जात प्रमाणपत्र पडताळणी सेवा शुल्कात वाढ
जात प्रमाणपत्र पडताळणी सेवाशुल्कात वाढ नागपूर : जात प्रमाणपत्र पडताळणीकरिता अर्ज सादर करताना येत्या १ सप्टेबरपासून सुधारित दराने सेवा शुल्क आकारण्याचे आदेश बार्टीकडून सर्व जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना प्राप्त झाले आहेत. त्यानुसार नागपूरला विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक ३ येथील नागरी सुविधा केंद्रात जात प्रमाणपत्र पडताळणीकरिता अर्ज स्वीकारताना विद्यार्थी विषयक प्रकरणे १०० रुपये सेवा पूर्व प्रकरणे ३०० रुपये, सेवांतर्गत प्रकरणे ५०० रुपये, निवडणूक विषयक प्रकरणे ५०० रुपये, जात प्रमाणपत्रासाठी अपील प्रकरणे ५०० रुपये शुल्क आकारण्यात येईल. याबाबतची नोंद सर्व संबंधितांनी घ्यावी, असे विभागीय जात प्रमाणपत्र समितीच्यावतीने कळविण्यात आले आहे.