शीलेश शर्मा, नवी दिल्लीकाळ्या पैशांच्या मुद्यावरून सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील वाद आणखी तीव्र होताना दिसत आहे. काळा पैसा परत आणण्याच्या नावाखाली सरकारने देशात आयकर अधिकाऱ्यांची दहशत पसरवली आहे, असा आरोप सोमवारी काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी केला. मनीष तिवारी म्हणाले की, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत या अधिकाऱ्यांनी लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आयकराच्या नोटीस पाठविल्या. प्रामाणिक करदात्यांमध्ये त्यामुळे भीती पसरली आहे. सरकारने काळा पैसा जाहीर करण्याची जी योजना जाहीर केली आहे त्या योजनेंतर्गत फक्त २४२८ कोटी रुपये मिळाले आहेत, तर विदेशी बँकांत भारतीयांचे २५ लाख कोटी रुपये असल्याचा दावा भाजपच्याच टास्क टीमने केला होता. मोदी यांनी हा निवडणुकीचा मुद्दा केला होता आणि हा पैसा शंभर दिवसांत आणण्याचा शब्द दिला होता, याची आठवणही तिवारी यांनी करून दिली. सर्वांच्या खात्यात १५-१५ लाख रुपये टाकण्याचेही आश्वासन दिले होते. दोन वर्षेझाली तरीही काळा पैसा आला नाही; पण आयकर अधिकाऱ्यांची दहशत मात्र आली आहे. काळा पैसा घोषित करण्याची योजना समाप्त होण्यास आता १८ दिवस बाकी आहेत आणि सरकारकडे देशातून ४००० कोटींचा कर जमा झाला, असेही ते म्हणाले.
आयकर अधिकाऱ्यांची दहशत पसरवली
By admin | Updated: September 13, 2016 05:06 IST