आयकर नोटीस/ जोड/ प्रतिक्रिया कोणत्याही पक्षाला लक्ष्य बनविण्यात आले नाही - भाजप
By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST
नवी दिल्ली : राजकीय देणग्यांबाबत आयकर नोटीस पाठविताना कोणत्याही एका पक्षाला लक्ष्य बनविण्यात आलेले नाही. याबाबत कायदा आपला मार्ग अवलंबेल, असे भाजपने स्पष्ट केले आहे. आम आदमी पार्टी (आप) किंवा एखाद्या पक्षाला लक्ष्य ठरवून नोटीस पाठविण्यात आलेल्या नाहीत. आयकर विभागाने काळा पैसा पांढरा करणाऱ्या ५० कंपन्यांना नोटीस पाठविल्या आहेत, असे भाजपचे सरचिटणीस श्रीकांत शर्मा यांनी म्हटले.
आयकर नोटीस/ जोड/ प्रतिक्रिया कोणत्याही पक्षाला लक्ष्य बनविण्यात आले नाही - भाजप
नवी दिल्ली : राजकीय देणग्यांबाबत आयकर नोटीस पाठविताना कोणत्याही एका पक्षाला लक्ष्य बनविण्यात आलेले नाही. याबाबत कायदा आपला मार्ग अवलंबेल, असे भाजपने स्पष्ट केले आहे. आम आदमी पार्टी (आप) किंवा एखाद्या पक्षाला लक्ष्य ठरवून नोटीस पाठविण्यात आलेल्या नाहीत. आयकर विभागाने काळा पैसा पांढरा करणाऱ्या ५० कंपन्यांना नोटीस पाठविल्या आहेत, असे भाजपचे सरचिटणीस श्रीकांत शर्मा यांनी म्हटले.नोटिसीबद्दल आपने चिंता का करावी? अरविंद केजरीवाल यांनी कोणत्याही तपासाला सामोरे जाण्याची आणि अटकेची भीती नसल्याचे याआधीच स्पष्ट केले आहे. नोटीस पाठविणे हा कायद्याच्या प्रक्रियेचा भाग आहे, असे भाजपचे अन्य प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी नमूद केले.