शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पॅन कार्डसाठी वडिलांचं नाव बंधनकारक नाही; 5 डिसेंबरपासून अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 19:59 IST

आयकर विभागाकडून अधिसूचना जारी

नवी दिल्ली: पॅन कार्डसाठी अर्ज करताना त्यात वडिलांच्या नावाचा उल्लेख करणं बंधनकारक नसेल, असं आयकर विभागानं म्हटलं आहे. पॅन कार्डसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा सांभाळ एकट्या आईनं केला असल्यास ती व्यक्ती आईचं नाव अर्जात नमूद करु शकते, असंदेखील आयकर विभागानं म्हटलं आहे. याबद्दल केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यामुळे अर्जदारांना पॅन कार्डसाठी अर्ज भरताना त्यात सिंगल पॅरेंट मदर असा पर्याय उपलब्ध असेल. यासाठी आयकर विभागानं नियमांमध्ये बदल केला आहे. पॅन कार्डसाठी अर्ज करताना वडिलांचं नाव नमूद करणं बंधनकारक आहे. मात्र 5 डिसेंबरपासून पॅन कार्डचा अर्ज करताना वडिलांच्या नावाचा उल्लेख करणं बंधनकारक असणार नाही. काही व्यक्तींच्या सांभाळ आणि संगोपनात त्यांच्या आईचा मोठा वाटा असतो. अशा व्यक्तींना त्यांच्या वडिलांचं नाव पॅन कार्डवर नको असतं. याउलट आपल्याला घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आईचं नाव पॅन कार्डवर लावण्याची त्यांची इच्छा असते. अशा व्यक्तींकडून आलेल्या मागण्या लक्षात घेता, पॅन कार्डसाठी अर्ज करताना वडिलांचं नाव नमूद करणं गरजेचं नसल्याचा निर्णय आयकर विभागानं घेतला आहे. 

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्स