शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

आयकर विभागाचा निर्वाणीचा इशारा; 31 डिसेंबरपूर्वी पॅन कार्डची नक्की पडताळणी करा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 10:29 AM

1 जानेवारीपासून काही नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.

ठळक मुद्दे1 जानेवारीपासून काही नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये झालेल्या घोषणेप्रमाणे पॅन कार्ड आणि आधार कार्डचे लिंकिंग करण्याची अंतिम मुदत ही 31 डिसेंबरपर्यंत आहे. लिंकिंग न केल्यास संबंधितांचे पॅन कार्ड हे निष्क्रिय होणार आहे.

नवी दिल्ली - नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वच सज्ज झाले आहेत. मात्र वर्षाअखेरीस अनेक महत्त्वाची कामं करणं अत्यंत गरजेचे आहे. 1 जानेवारीपासून काही नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये झालेल्या घोषणेप्रमाणे पॅन कार्ड आणि आधार कार्डचे लिंकिंग करण्याची अंतिम मुदत ही 31 डिसेंबरपर्यंत आहे. या वर्षाअखेर असे लिंकिंग न केल्यास संबंधितांचे पॅन कार्ड हे निष्क्रिय होणार आहे. त्यामुळे हे लिंकिंग तातडीने करणे गरजेचे आहे. 

पॅन व आधारची जोडणी करण्याची मुदत याआधी 30 सप्टेंबरपर्यंत होती. मात्र, प्रत्यक्ष कर मंडळाने नंतर ती 31 डिसेंबरपर्यंत वाढविली होती. ही मुदत संपण्याच्या आधी प्राप्तिकर विभागाने या मुदतीची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे. त्यामुळे आपले कोणत्याही कारणास्तव पॅन कार्ड हे आधार कार्डला जोडणे शक्य झाले नसेल तर दोन दिवसांत जोडता येणार आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्डचे लिंकिंग हे ऑनलाईन पद्धतीने केले जाऊ शकते.

आधार कार्डाशी पॅन कार्ड असे करा लिंक 

- सर्वप्रथम https://www.incometaxindiaefiling.gov.in या इन्कम टॅक्सच्या ई-पोर्टलवर लॉग इन करावे.

- होम पेजच्या डाव्या बाजूला असलेल्या लिंक आधार या पर्यायावर क्लिक करा.

- पर्यायावर क्लिक केल्यावर तेथे पॅन कार्डचा नंबर तसेच आधार नंबर, आधार कार्डावर असलेले नाव टाकावे.

- आधार कार्डावर केवळ जन्माचे वर्ष असल्यास त्या पर्यायाला टीक करावी.

- सर्व माहिती भरल्यानंतर तेथे असलेला कॅप्चा टाकून सबमिट करावे.

- लिंक झाल्यावर एक मेसेज मिळेल. जर आपले पॅन आणि आधार कार्ड आधीच लिंक झालेले असेल, तर तसा मेसेज आपल्याला दिसेल. एसएमएसद्वारेही हे लिंक करता येते. 

1 जानेवारीपासून नियमांमध्ये होणार 5 मोठे बदल

2018-19 या आर्थिक वर्षात उशिराने आयकर भरायचा असल्यास 1 मार्च 2020 पर्यंत विना विलंब शुल्क भरता येणार आहे, पण 31 डिसेंबरपर्यंत भरल्यास लेट फी भरावी लागणार आहे. या काळात 5 हजारांचा दंड आहे. 1 जानेवारीपासून पुढील आर्थिक वर्षासाठी हा दंड 10 हजार करण्यात आला आहे. तर 5 लाखांहून कमी उत्पन्न असल्यास 1 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. 

स्टेट बँकेचे मॅग्नेटिक स्ट्रीप असलेले एटीएम कार्ड बदलण्याची शेवटची मुदत 31 डिसेंबरपर्यंतच आहे. 1 जानेवारीपासून या कार्डद्वारे पैसे काढता येणार नाहीत. एसबीआयने नवीन कार्ड घेण्याचे आवाहन केले आहे. 

केंद्र सरकारच्या सबका विश्वास योजनेची मुदत 31 डिसेंबरला संपणार आहे. सेवा कर आणि उत्पादन शुल्काशी संबंधीत जुन्या प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. 

येत्या वर्षापासून एनईएफटीवर बँका कोणतेही शुल्क आकारणार नाहीत. याआधी 24 तास एनईएफटी करण्याची सुविधा देण्यात आली होती. रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला होता. डिजिटल पेमेंटला चालना मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. एचडीएफसी बँकेने वर्षभरापूर्वीच अ‍ॅपद्वारे एनईएफटी चार्ज रद्द केला होता. 

वस्तू सेवा कराची (जीएसटी) नोंदणी सुलभ व्हावी यासाठी आधार नंबरद्वारे नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नवीन जीएसटी परतावा करण्याची प्रणाली 1 जानेवारीपासून वापरली जाणार आहे. 

 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डPan Cardपॅन कार्डIncome Taxइन्कम टॅक्स