शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसमावेशक विकास हाच प्राधान्यक्रम

By admin | Updated: February 23, 2015 23:20 IST

संसदेच्या संयुक्त अधिवेशनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाने सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली़ सर्वसमावेशक विकास हाच केंद्र सरकारचा प्राधान्यक्रम असल्याचे राष्ट्रपतींनी

नवी दिल्ली : संसदेच्या संयुक्त अधिवेशनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाने सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली़ सर्वसमावेशक विकास हाच केंद्र सरकारचा प्राधान्यक्रम असल्याचे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले़आपल्या अभिभाषणात राष्ट्रपतींनी केंद्र सरकारच्या आतापर्यंतच्या आणि भविष्यातील योजनांची माहिती दिली़ ‘सबका साथ, सबका विकास’ हेच केंद्र सरकारचे लक्ष्य असल्याचे ते म्हणाले़ जनतेच्या इच्छा आणि आकांक्षेनुरूप संसदेत प्रगतिशील कायदे आणण्यासाठी सरकार कायम प्रयत्नशील असेल, असेही ते म्हणाले़ सदस्यांनी परस्पर सहकार्य आणि सद्भावनेसह संसदेचे कामकाज सुरळीत चालू द्यावे, असे आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केले़ग्रामविकास, गरिबी निर्मूलन, रोजगार वाढ यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत २०२२ पर्यंत सर्वांना निवारा देण्यास सरकार वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले़ जन-धन योजनेअंतर्गत देशात १३़२ कोटी खाती उघडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले़ कौशल्य विकासावर भर देत, सर्वांचा सर्वसमावेश विकास हेच माझ्या सरकारचे ध्येय आहे़ सबका साथ, सबका विकास हेच माझ्या सरकारचे लक्ष्य आहे, असेही ते म्हणाले़वादग्रस्त भूसंपादन कायद्याला विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून विरोध सुरू असताना, या कायद्यातील प्रस्तावित बदलामुळे विकास साध्य होईल, असे प्रतिपादन राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात केले़ भूसंपादन विधेयकातील बदल विकासासाठी आवश्यक आहे़ भूसंपादनामुळे प्रभावित शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन यात बदल केले गेले आहेत़ दरम्यान, राज्यसभेवर निवडून आल्यानंतर गुलाम नबी आझाद यांची राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी पुन्हा निवड झाली आहे. मीर मोहम्मद फयाज, नझीर अहमद लावे (दोघेही पीडीपी), शमशेरसिंग मनहास (भाजप) यांच्यासह आझाद यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. (लोकमत न्यूज नेटवर्क)