वहिवाटीच्या रस्त्यावरून दोन गटात धुमक्री उमाळे शिवारातील घटना : हाणामारीत विळे, लोखंडी टॅमीचा वापर; दोन्ही गटातील सहा ते सात जण जखमी; औद्योगिक
By admin | Updated: March 15, 2016 00:33 IST
जळगाव : शेतजमिनीतून गेलेल्या वहिवाटीच्या रस्त्याच्या कारणावरून उमाळे (ता.जळगाव) शिवारात दोन गटात सोमवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास धुमक्री उडाली. शाब्दिक वाद विकोपाला गेल्यावर दोन्ही गटातील सदस्य एकमेकांवर तुटून पडले. हाणामारीत विळे, लोखंडी टॅमीचा वापर झाल्याने सहा ते सात जण जखमी झाले. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
वहिवाटीच्या रस्त्यावरून दोन गटात धुमक्री उमाळे शिवारातील घटना : हाणामारीत विळे, लोखंडी टॅमीचा वापर; दोन्ही गटातील सहा ते सात जण जखमी; औद्योगिक
जळगाव : शेतजमिनीतून गेलेल्या वहिवाटीच्या रस्त्याच्या कारणावरून उमाळे (ता.जळगाव) शिवारात दोन गटात सोमवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास धुमक्री उडाली. शाब्दिक वाद विकोपाला गेल्यावर दोन्ही गटातील सदस्य एकमेकांवर तुटून पडले. हाणामारीत विळे, लोखंडी टॅमीचा वापर झाल्याने सहा ते सात जण जखमी झाले. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील कुंभारी सीम येथील रहिवासी असलेले नीलेश सुभाष पाटील यांची जळगाव-औरंगाबाद महामार्गाला लागून उमाळे शिवारात शेती गट क्रमांक ११९ मध्ये पावणे चार एकर शेती आहे. ही शेती त्यांनी जळगावातील महेंद्र ग्यानचंद रायसोनी यांना दीड ते दोन महिन्यांपूर्वी विकली आहे. शेतीच्या विक्रीचा कागदोपत्री व्यवहार पूर्ण झालेला आहे. परंतु महेंद्र रायसोनी यांनी अद्यापही त्या शेतीचा प्रत्यक्ष ताबा घेतलेला नाही. ताबा देण्यापूर्वी शेतीचे शासकीय मोजमाप करून तिला कंपाऊंड करण्यासाठी नीलेश पाटील यांच्यासह त्यांचे नातलग नीलेश शालिक साबळे, सचिन पांडुरंग सोन्ने, मंगेश शांताराम पाटील, भूषण शिवा दांडेकर व काही मजूरवर्ग सोमवारी दुपारी शेतात गेलेले होते. जेसीबीच्या साहाय्याने जमिनीच्या सपाटीकरणाचे काम सुरू असताना दुपारी २ वाजेच्या सुमाराम उमाळे गावातील देवीदास गोविंदा खडसे, भरत देवीदास खडसे, पिंटू खडसे, समाधान खडसे यांच्यासह सात ते आठ जणांनी त्याठिकाणी येऊन गट क्रमांक ११९ मधील शेतजमिनीत पूर्वीपासून वहिवाटीचा रस्ता असल्याचे सांगत रस्ता देण्याची मागणी केली. मात्र, शासकीय दस्तावेजानुसार या शेतजमिनीतून पलीकडच्या शेतांमध्ये जाण्यासाठी वहिवाटीचा रस्ता नसल्याचे एक गट सांगत होता तर याठिकाणी रस्ता असल्याचे दुसरा गट सांगत होता. याच कारणावरून वादाची ठिणगी पडल्याने भडका झाला.घटनेचे छायाचित्रीकरण वादाचे मूळ कारणशेतीजमिनीच्या विक्रीचा व्यवहार पूर्ण झाल्याने तिला कंपाऊंड करण्यासाठी जेसीबीने सपाटीकरणाचे काम सुरू असल्याचे पहिल्या गटाच्या म्हणणे होते. तर दुसर्या गटाकडून, संबंधितांनी जेसीबीने पूर्वीपासून असलेला वहिवाटीचा रस्ता बुजून टाकल्याचे सांगण्यात येत होते. त्याठिकाणी सुरू असलेल्या या प्रकाराचे काही उपस्थितांनी भ्रमणध्वनीत चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केल्यावर खरा वाद उफाळून आला. त्यानंतर दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गट हाणामारीनंतर तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले. त्याठिकाणी पोलीस उपनिरीक्षक जगदीश देवरे यांनी संतप्त जमावाची समजूत काढली.