शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार अलर्ट, ऑक्सीजन सप्लाय-व्हेटिलेटरसंदर्भात राज्यांना दिले असे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 15:14 IST

प्रवाशांना आरटी-पीसीआर रिपोर्ट द्यावा लागेल. विमानतळावर त्यांचे थर्मल स्कॅनिंग होईल आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास बाधितांना क्वारंटाईन केले जाईल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकार अलर्ट मोडवर आले आहे. कोरोना संकटात वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा सुनिश्चित करण्यासंदर्भात आरोग्य सचिवांनी राज्य सरकारांना पत्र लिहिले आहे. या पत्रात आरोग्य सचिवांनी राज्यांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन मशीन दुरुस्त करण्यास सांगितले आहे. यातच, आजपासून विमानतळांवर रँडम टेस्टिंग देखील सुरू केली आहे. ज्या प्रवाशांचा अहवाल पॉझिटिव्ह येईल त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. कोरोनाचा सब व्हेरिअंट  BF.7 ने चीनमध्ये हाहाकार माजला आहे. यामुळे भारती अलर्ट मोडवर आला आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे निवेदन -कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज (शनिवारी) सांगितले की, परदेशातून आलेले प्रवासी ट्रॅक केले जातील. प्रवाशांना आरटी-पीसीआर रिपोर्ट द्यावा लागेल. विमानतळावर त्यांचे थर्मल स्कॅनिंग होईल आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास बाधितांना क्वारंटाईन केले जाईल.

बूस्टर डोस घेण्यासाठी केंद्रांवर गर्दी - दरम्यान, वृत्त आहे की, लखनऊमध्ये रुग्णालयांमधील लसीकरण केंद्रांवर जाऊन लोक मोठ्या प्रमाणात बूस्टर डोस घेत आहेत. लसीकरण केंद्रांवर लोकांची गर्दी वाढू लागली आहे. कोरोना लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतर, बहुतेक लोक बूस्टर डोस देण्यास टाळाटाळ करत होते. मात्र पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढण्याची भीतीने लोक लसीकरण केंद्रांवर जाऊन बूस्टर डोस घेत आहेत.

कोरोनाचा धोका वाढला - चीन, जपान आणि अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढत आहे. हे पाहता केंद्र सरकार सतर्क झाले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वतीने लोकांना कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय ज्यांनी अद्याप बूस्टर डोस घेतलेला नाही त्यांना बूस्टर डोस घेण्यास सांगण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलNarendra Modiनरेंद्र मोदी