शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय जनता दलात गळती; देवेंद्र यादव यांचीही पक्षाला सोडचिठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 09:37 IST

तिकीट वाटपावरून सुरू असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते पक्षाला रामराम ठोकत आहेत.

एस. पी. सिन्हालोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा (बिहार): लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्त्वाखालील राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाला एकामागून एक धक्के बसत आहेत. तिकीट वाटपावरून सुरू असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते पक्षाला रामराम ठोकत आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले वृषिन पटेल यांनी पक्ष सोडल्यानंतर राज्यसभेचे माजी खा. अशफाक करीम यांनीही तिकीटवाटपामुळे नाराजी दाखवत राजदसोबत चार हात लांब होण्याचा निर्णय घेतला. ही जखम अजून भरून निघालेली नसतानाच पक्षाचे आणखी एक मोठे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री देवेंद्र प्रसाद यादव यांनीही बुधवारी पक्षाचा राजीनामा दिला.

देवेंद्र यादव म्हणाले की, राजदमध्ये जे राजकारण सुरू आहे ते केवळ सत्तेसाठी आहे, त्यात कोणतेही धोरण नाही, तर सत्ता आणि धोरण या दोघांमध्ये सामंजस्य असणे आवश्यक होते. या दोघांमधील सामंजस्य मला दूरदूरपर्यंत दिसत नाही. अशा परिस्थितीत पक्षात राहणे शक्य नाही. मी पक्षाच्या सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्त्वाचाही राजीनामा देत आहे.

बिहारमधील लाखो लोक मतदानापासून राहणार वंचितनिवडणुकीच्या गदारोळात उदरनिर्वाहाच्या शोधात इतर राज्यांमध्ये राहणाऱ्या बिहारमधील लाखो मतदारांना यावेळीही मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे. बिहारच्या प्रत्येक भागातील मजूर प्रत्येक वेळी मतदानापासून वंचित राहतात. यासंदर्भात एका कामगार संघटनेचे राज्य सचिव मुकेश कुमार मुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील लाखो कामगार कामासाठी राज्याबाहेर आहेत. होळीनिमित्त सर्वजण घरी आले होते, मात्र, होळीनंतर ते आपापल्या कामाच्या ठिकाणी परतले. यासंदर्भात बोलताना कुमार म्हणाले की, याबाबत केंद्र सरकारने किमान सात दिवसांच्या सुटीचा नियम लागू करावा. ज्यामुळे इतर राज्यात काम करणारे मजूर त्यांच्या घरी येऊन मतदान करू शकतात.

टॅग्स :BiharबिहारRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल