शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

९० मिनिटांत 'त्याने' ५० जणांचा घेतला चावा; लोकांमध्ये पसरली दहशत, संतप्त जमावाने ठार केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 11:09 IST

कुणाच्या गळ्याला, कुणाच्या पायाला तर कुणाच्या हाताला पिसाळलेल्या कुत्र्‍याने चावा घेतला. या जखमींना तात्काळ प्राथमिक उपचार करून एँटी रॅबीज इंजेक्शन देण्यात आले.

बिहारच्या सासाराम जिल्ह्यातील जमालपूर आणि हरिहरगंज इथं एका पिसाळलेल्या कुत्र्‍याच्या दहशतीने स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरले होते. रविवारी सकाळी या कुत्र्‍याने दीड तासात ५० लोकांचा चावा घेतला. त्याशिवाय अनेक गुरेढोरेही पिसाळलेल्या श्वानाला बळी पडले. कुत्र्‍याच्या या दहशतीने सगळीकडे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अखेर संतापलेल्या गावकाऱ्यांनी या कुत्र्‍याला घेरून मारून टाकल्याचा प्रकार घडला आहे.

माहितीनुसार, रविवारी सकाळी पिसाळलेल्या कुत्र्‍यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पाहता पाहता या भटक्या कुत्र्‍याने ५० जणांचा चावा घेतला. कुत्र्‍याच्या दहशतीने लोक सैरावैरा पळू लागले. काही वेळातच परिसरात मोठा गोंधळ उडाला. कुत्र्‍याच्या या दहशतीने परिसरातील संतप्त जमावाने कुत्र्‍याला घेराव करत ठार केले. पहाटे ५ च्या सुमारास हा प्रकार घडला. लोक मॉर्निंग वॉक करण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. त्यावेळी कुत्र्‍याने गावकऱ्यांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. रस्त्यावर जो कुणी दिसत होता त्याच्यावर हा श्वान हल्ला करत होता. 

कुणाच्या गळ्याला, कुणाच्या पायाला तर कुणाच्या हाताला पिसाळलेल्या कुत्र्‍याने चावा घेतला. या जखमींना तात्काळ प्राथमिक उपचार करून एँटी रॅबीज इंजेक्शन देण्यात आले. दुपारपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमी लोकांची गर्दी झाली होती. अतिमीगंज, जमालपूर, हरिहरगंज आणि नासरीगंज इथल्या अनेक गावकऱ्यांना रॅबीज इंजेक्शन देण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधीही घटनास्थळी पोहचले. सध्याचे संकट पाहता प्रशासनाने परिसरातील भटक्या कुत्र्‍यांना पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यात या कुत्र्‍यांना पकडून वन विभागाच्या स्वाधीन केले जाणार आहे.

कुत्रं चावल्यावर तातडीने करा 'हे' काम

भारतात दरवर्षी १८ ते २० हजार लोकांचा जीव कुत्रं चावल्यामुळे जातो. कारण बरेच लोक कुत्रा चावल्यावर लगेच त्यावर योग्य ते उपचार न घेता थोडीच जखम झाल्याचं सांगत त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र कुत्रा चावल्यानंतर काळजी घेणे आवश्यक आहे. ज्या जागेवर कुत्र्यानं चावलं आहे, ती जागा लवकर साफ करा. पाणी लावायला अजिबात घाबरू नका. ही जखम १० ते १५ मिनिटं अ‍ॅंटी-सेप्टिक सोप व पाण्यानं साफ करा. जखम साफ केल्यावर त्यावर अ‍ॅंटीसेप्टिक लावा. हे केल्यावर रक्तस्त्राव कमी व्हायला हवा. जर असं झालं नाही तर पट्टी बांधून रक्तस्त्राव रोखा. त्यानंतर लगेच डॉक्टरांकडे जा. 

टॅग्स :dogकुत्रा