सुधारित-पंढरपूर राहुट्या
By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST
चंद्रभागेतील राहुट्यांना
सुधारित-पंढरपूर राहुट्या
चंद्रभागेतील राहुट्यांनाकोर्टाचा तूर्त दिलासा मुंबई : पंढरपूरमधील माघी यात्रेसाठी चंद्रभागा नदीच्या पात्रातील वाळवंटात उभारलेल्या राहुट्यांना उच्च न्यायालयाने शुक्रवारी तात्पुरते अभय दिले़ मात्र यापुढे नदीत राहुट्या उभारणार नाही, अशी हमी संबंधितांकडून घ्या, असे आदेश न्यायालयाने शासनाला दिले़चंद्रभागा प्रदूषित होत असल्याने न्यायालयाने गेल्या महिन्यात येथे वाहने धुण्यापासून तर नदीत घाण करणार्यांपर्यंत सर्वांवरच कडक निर्बंध आणले आहेत़ मात्र आता येथे होणार्या कार्यक्रमांसाठी नदी पात्रात राहुट्या उभारण्यात आल्या आहेत़राहुट्या हटविताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो़ त्यामुळे माघी यात्रेसाठी तात्पुरत्या उभारलेल्या राहुट्या जैसे थे राहू द्या, अशी विनंती मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठाला केली़ ती ग्राह्य धरत न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले व सुनावणी तहकूब केली़ (प्रतिनिधी)