शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित- मध्य प्रदेश व्यापमं घोटाळा

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

माझे नाव गोवण्यात गलिच्छ राजकारण

माझे नाव गोवण्यात गलिच्छ राजकारण
मध्य प्रदेश व्यापमं घोटाळा : केंद्रीय मंत्री उमा भारती यांचा आरोप
भोपाळ : मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळ्यात काँग्रेस पक्षातर्फे आपले नाव गोवण्यात आल्याबद्दल केंद्रीय जलस्रोत मंत्री उमा भारती यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या मुद्यावर अत्यंत गलिच्छ राजकारण खेळल्या जात असल्याचा त्यांचा आरोप आहे.
मंगळवारी येथे आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, एक वर्षापूर्वी व्यापमं घोटाळ्याशी संबंधित बातम्यांमध्ये माझ्या नावाचा उल्लेख बघून आश्चर्य वाटले होते. ज्या प्रकरणाच्या केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशीची माझी मागणी आहे त्याच घोटाळ्यात अचानक सहा महिन्यांनंतर माझे नाव गोवले जावे हा एक राजकीय कटच आहे.
काँग्रेसने केलेल्या आरोपांबद्दल विचारले असता प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आपण याविषयी काहीही वक्तव्य करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
दीड वर्षांपूर्वी व्यापमं घोटाळा उघडकीस आला त्यावेळी आपण मुख्यमंत्री शिवराज चौहान यांना या प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या सुपूर्द करण्याचा सल्ला दिला होता. नंतर त्यांनी हे प्रकरण विशेष कृती दलाकडे (एसटीएफ) सोपविण्याचा निर्णय घेतला, असे भारती यांनी नंतर जारी केलेल्या बयानात सांगितले.
याप्रकरणी गेल्या वर्षीच पोलीस मुख्यालयात जाऊन बयान नोंदविण्याची माझी इच्छा होती. परंतु एसटीएफचे पोलीस महानिरीक्षक यांनी माझा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते, असे भारती यांचे म्हणणे आहे.
सकाळी शिवरात्री उत्सवानिमित्त येथील महाकालचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या उमा भारती यांच्यावर पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार केला. तेव्हा या मुद्यावर आपण तूर्तास काहीही बोलणार नाही. योग्य वेळी पत्रकाद्वारे संपूर्ण चित्र स्पष्ट करू, असे त्यांनी सांगितले होते. पत्रक केव्हा काढणार? असे विचारले असता लवकरच, असेही त्या म्हणाल्या होत्या.
काँग्रेसच्या नेत्यांनी सोमवारी या घोटाळ्यावरून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्यावर कडाडून हल्ला चढविताना मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांचा बचाव करण्यासाठी मूळ एक्सेल शीटसोबत छेडछाड करण्यात आल्याचा आरोप केला होता. तपास संस्थांनी भारती यांची भूमिका नाहक वाढवून चढवून दाखविली, असे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांचे म्हणणे होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंग, कमलनाथ, ज्योतिरादित्य शिंदे, सुरेश पचौरी, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अरुण यादव आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सत्यदेव कटारे यांनी संयुक्त पत्रपरिषद घेऊन या घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीची आणि मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मूळ एक्सेल शीटमध्ये उमा भारती यांच्या नावाचा उल्लेख १० वेळा होता. परंतु शीटसोबत छेडछाड करून तो १७ वेळा करण्यात आला, असा दावा या नेत्यांनी केला आहे. भारती यांची प्रतिमा मलीन करण्यासाठीच असे करण्यात आल्याचेही त्यांचे म्हणणे होते. राज्यातील भाजपाच्या राजकारणात मुख्यमंत्री चौहान आणि उमा भारती हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी मानले जातात. (वृत्तसंस्था)