सुधारित - आतील पान मस्ट/-डेक्कन क्रॉनिकल
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
(ही सुधारित बातमी सर्व आवृत्त्यांनी आतील पानात वापरणे मस्ट आहे. - सेंट्रल डेस्क)
सुधारित - आतील पान मस्ट/-डेक्कन क्रॉनिकल
(ही सुधारित बातमी सर्व आवृत्त्यांनी आतील पानात वापरणे मस्ट आहे. - सेंट्रल डेस्क)़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़सुधारित - डेक्कन क्रॉनिकलच्या अध्यक्षांना अटक नवी दिल्ली : हैदराबादेतील इंग्रजी वृत्तपत्र डेक्कन क्रॉनिकलचे अध्यक्ष टी. व्यंकटरमण रेड्डी यांना शनिवारी सीबीआयने अटक केली. कॅनरा बँकेकडून घेतलेले ३५७ कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहेे.सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॅनरा बँक,बेंगळुरुतर्फे डेक्कन क्रॉनिकल होल्डिंग्ज लिमिटेडविरुद्ध (डीसीएचएल) दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे जुलै २०१३ मध्ये तपास संस्थेने कंपनीवर गुन्हा नोंदविला होता. त्याच प्रकरणात रेड्डी यांना अटक झाली आहे. डेक्कन क्रॉनिकल, एशियन एज, फायनान्स क्रॉनिकल आणि आंध्रभूमी हे तेलगू वृत्तपत्र डेक्कन क्रॉनिकल होल्डिंग्ज लिमिटेड या कंपनीतर्फे प्रकाशित केले जाते. याशिवाय आयपीएलमधील एक संघ डेक्कन चार्जेसचे मालकी हक्कही काही वर्षे डीसीएचएलकडे होते. सीबीआयने २०१३ मध्ये रेड्डी यांच्याविरुद्ध फसवणूक आणि गुन्हेगारी कटाचा गुन्हा नोंदविला होता. कंपनीने परतफेड न केलेल्या कर्जाच्या रकमेची पुनर्रचना करण्यास बँकेने नकार दिला होता. बेंगळुरु येथे रेड्डी यांचा जाबजबाब घेतल्यानंतर सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले. कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टी. विनायक रेड्डी यांनाही अटक करण्यात आल्याचे सीबीआयच्या सूत्रानी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़