शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

सुधारित फायनल- मोदींच्या वादग्रस्त कोटाचा बोलबाला!

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

दुसर्‍या दिवशी १.४८ कोटींची बोली : आज होणार अंतिम निर्णय

दुसर्‍या दिवशी १.४८ कोटींची बोली : आज होणार अंतिम निर्णय
सूरत- येथील लिलावात ठेवण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्या वादग्रस्त कोटाची किंमत गुरुवारी दुसर्‍या दिवशी १.४८ कोटीवर गेली आहे. आतापर्यंतची ही सर्वोच्च बोली आहे. आज २० फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजेपर्यंत इच्छुकांना या कोटासह लिलावात ठेवलेल्या ४५५ भेटवस्तूंची बोली लावता येणार असून त्यानंतर सर्वाधिक बोली लावणार्‍यास या वस्तूंची विक्री केली जाईल.
मोदी यांनी हा सूट गेल्या महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेटीदरम्यान परिधान केला होता. गुरुवारी सायंकाळी सुरतमधील हिरे व्यापारी मुकेश पटेल यांनी आपली बोलीची रक्कम १ कोटी ३९ लाखावरुन १ कोटी ४८ लाख करीत सर्वांनाच धक्का दिला.
दुपारी भावनगर येथील हिरे व्यापारी आणि लीला ग्रूप ऑफ कंपनीजचे मुख्य प्रबंध संचालक कोमलकांत शर्मा यांनी मोदींच्या या सूटसाठी १ कोटी ४१ लाख रुपये देऊ केले होते. त्यांना या नव्या प्रस्तावाने मागे टाकले आहे.
दुपारी या कोटासाठी एकपाठोपाठ एक १.४१ कोटी आणि १.३९ कोटीचे दोन प्रस्ताव आले होते . तत्पूर्वी सकाळी १.२५ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती.
सकाळी सर्वप्रथम ग्लोबल मोदी फॅन क्लबची स्थापना करणारे स्थानिक कापड व्यापारी राजेश माहेश्वरी यांनी हा कोट १ कोटी २५ लाख रुपयांना खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला. बुधवारी आणखी एक कापड व्यापारी राजेश जुनेजा यांनी १ कोटी २१ लाख रुपयांची बोली लावली होती. या बोलीच्या तुलनेत दुसर्‍या दिवशीची पटेल यांची बोली २७ लाखांनी जास्त आहे.
येथील सायन्स कन्व्हेंशन सेंटरमध्ये आयोजित या लिलावात मोदी यांच्या गडद निळ्या रंगाच्या आणि त्यांच्या संपूर्ण नावाच्या उभ्या पट्ट्या कापडातच विणलेल्या या कोटचा प्रचंड बोलबाला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या या कोटाला राजकीय रंगही प्राप्त झाला असून विरोधी पक्षांकडून टीकास्त्रांचा मारा होत आहे.
टी-शर्ट मागे पडले
एकीकडे मोदींच्या कोटवर व्यापार्‍यांच्या उड्या पडत असल्या तरी या लिलावात ठेवण्यात आलेले त्यांचे दोन टी शर्ट मात्र फारसे लक्ष वेधू श्कले नाहीत. फार कमी लोकांनी त्यांची बोली लावली. सुरुवातीला क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या टी शर्टसाठी केवळ दीड ते दोन हजारापर्यतची बोली आली होती. परंतु सायंकाळी भाजपाचे सुरतमधील आमदार आणि व्यापारी हर्ष संघवी यांनी फूटबॉल वर्ल्डकप जर्सी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया टी शर्टसाठी १ लाख ११ हजाराच्या दोन स्वतंत्र बोली लावल्या.
(वृत्तसंस्था)
कोट
स्वच्छ गंगा मोहिमेसारख्या एका चांगल्या कार्यासाठी हा लिलाव होत असल्याने शर्मा यांनी ही बोली लावली असून शुक्रवारी ते स्वत: येथे हजर राहणार आहेत. आणि गरज पडल्यास ते आपल्या बोलीची रक्कम वाढवतील.
चिराग मेहता
शर्मा यांचे प्रतिनिधी
लिलावात अनेक वस्तू आहेत. परंतु माझी पसंती मोदींच्या सूटलाच आहे. मी हिर्‍यांप्रमाणे हा सूट जपून ठेवेन.
मुकेश पटेल
आम्ही मोदी यांचे सच्चे समर्थक आहोत. त्यामुळेच सव्वा कोटी रुपयांची बोली लावली. विविध सोशल नेटवर्किंग साईटवर आमचे ५,००० मित्र आहेत. मी बोलीचा प्रस्ताव मांडल्यानंतर सर्वच राजी झाले. प्रत्येकाने ५०,००० रुपये दिले तरी ही रक्कम जमा होते.
राजेश माहेश्वरी