शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

उत्तर प्रदेशमध्ये 4 मोठ्या अधिका-यांवर प्राप्तिकर विभागाचा छापा

By admin | Updated: May 24, 2017 14:34 IST

प्राप्तिकर विभागानं राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिका-यांसह 4 ऑफिसर्सच्या 22 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमतलखनऊ, दि. 24 -  उत्तर प्रदेशच्या नोकरशहांवर मोठी कारवाई करत प्राप्तिकर विभागानं राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिका-यांसह 4 ऑफिसर्सच्या 22 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. मेरठ, दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादमध्ये ही छापेमारी केली आहे. गाझियाबादचे माजी डीएम विमल शर्मा यांच्या घरीही छापा टाकण्यात आला आहे. शर्मा सद्यस्थितीत नोएडा अथॉरिटीचे अडिशनल CEO आहेत. मेरठची RTO ममता शर्मा, बागपतचे माजी डीएम हृदय शंकर तिवारी यांच्या घरावरही छापेमारी करण्यात आली. तिवारी सध्या उत्तर प्रदेशमधल्या आरोग्य विभागात कार्यरत आहेत. प्राप्तिकर विभागानं एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं असून, छापेमारीच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. उत्तर प्रदेश सरकारचे नोकरशाह यांच्या संदर्भातील तीन प्रकरणात ही छापेमारी करण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाच्या माहितीनुसार, IAS हृदय शंकर तिवारी यांच्याविरोधात दिल्ली, लखनऊ, मेरठ, बागपत, ग्रेटर नोएडासहीत 8 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. तिवारी सध्या उत्तर प्रदेशमधल्या आरोग्य विभागात संचालक पदावर कार्यरत आहेत. IAS विमल कुमार शर्मा आणि त्यांची पत्नी ममता शर्मा यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. मेरठ, नोएडा आणि मैनपुरीमधल्या जवळपास 8 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. तर सत्येंद्र कुमार सिंह यांच्याही कार्यालयावर छापेमारी करण्यात आली आहे. सध्या ते उत्तर प्रदेशमधल्या विशेष सचिव पदावर कार्यरत आहेत. या प्रकरणात लखनऊ आणि नोएडामध्ये 6 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.