शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

महत्वाचे-मराठीला राजभाषेचा दर्जा-पान १

By admin | Updated: July 31, 2015 23:54 IST

मराठीच्या शिरपेचात राजभाषेचा मुकूट!

मराठीच्या शिरपेचात राजभाषेचा मुकूट!
-मराठी राजभाषा विधेयक विधान परिषदेत संमत
मुंबई-स‘ाद्रीच्या दर्‍या-खोर्‍यातून बालघाटच्या रांगेतून गर्जणार्‍या, संताच्या अभंगवाणीपासून आधुनिक साहित्यापर्यंत अभिव्यक्त होणार्‍या आणि अभिजनांपासून बहुजनापर्यंत सर्वांमुखी आलेल्या मराठी भाषेच्या डोईवर आज अधिकृतपणे राजभाषेचा मुकूट चढवला गेला.
मराठी भाषा ही महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा असल्याचे सुस्पष्टपणे घोषित करण्यासाठीचे राजभाषा सुधारणा विधेयक आज विधान परिषदेतही एकमताने मंजूर करण्यात आले. त्यामुळे आता मराठी भाषेला राजभाषा म्हणून कायदेशीर मान्यता मिळाली आहे.
मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असल्याची स्पष्ट तरतूद आजवर कायद्यात नव्हती. त्यामुळे सभागृहाने सदर विधेयक एकमताने मंजूर करत ऐतिहासिक निर्णय घ्यावा आणि याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडावा, अशी मागणी दिवाकर रावते यांनी केली. राष्ट्रवादीचे सदस्य हेमंत टकले यांनी या मागणीला अनुमोदन देत मराठीला राजभाषेचा दर्जा देणारे विधेयक आणल्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन केले.
यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधेयक सभागृहात मांडले. परंपरेने मराठी राजभाषा असली तरी कायद्यात तशी तरतूद नव्हती. याबाबत सांस्कृतिक कार्य व मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी पुढाकार घेत कायद्यात सुधारणा करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी तावडे यांचे अभिनंदन केले. या विधेयकामुळे मराठी राजभाषेला कायदेशीर मान्यतेचा मार्ग मोकळा होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
त्यानंतर दोन्ही बाकांवरील सदस्यांनी एकमताने राजभाषा सुधारणा विधेयकावर संमतीची मोहोर उठवली. विधानसभेत हे विधेयक यापूर्वीच मंजूर झालेले असल्याने मराठीच्या राजभाषेवर आज अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले.
(प्रतिनिधी)
==============