शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
2
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
3
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
4
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
5
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
6
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
7
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
8
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
9
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
10
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
11
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
12
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
13
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
14
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
15
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
17
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
18
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
19
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
20
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष

महत्त्त्वाच्या बातम्या

By admin | Updated: October 3, 2015 00:20 IST

स्मशानभूमीत मूलभूत सुविधांचा अभाव

स्मशानभूमीत मूलभूत सुविधांचा अभाव
उमरेड : तालुक्यातील बहुतांश गावांमधील स्मशानभूमीतील दहनशेडची दुरवस्था झाली असून, मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे नागरिकांना अंत्यसंस्काराच्यावेळी विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने स्मशानभूमीच्या दुरुस्ती तसेच सुविधांच्या निर्मितीसाठी शासनाने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.
***
शहरात जडवाहनांना प्रवेशबंदी करा
मौदा : शहरातील अंतर्गत रस्त्यांवर जड वाहनांची वाहतूक वाढली आहे. त्यामुळे शहरात अपघातांचे प्रमाण वाढले असून, रस्त्यांचीही दैनावस्था झाली आहे. त्यामुळे जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
***
पांदण रस्त्यावरील अतिक्रमण हटवा
कामठी : तालुक्यातील काही गावांमधील पांदण रस्त्यांवर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे सदर रस्ते अरुंद झाले असून, शेतीची वहिवाट करण्यास शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने सदर अतिक्रमण हटविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
***
जवाहर विहिरी वाटपात घोळ
सावनेर : मनरेगाअंतर्गत पूर्वी तालुक्यातील काही शेतकऱ्यांना जवाहर विहिरींचे वाटप करण्यात आले. यात काही गरीब लाभार्थ्यांना डावलण्यात आले असून, काही श्रीमंत शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
***
कन्हान नदीचे अस्तित्व धोक्यात
खापरखेडा : सावनेर तालुक्यातील कन्हान व कोलार नदीच्या पात्रातून पोकलॅण्ड मशीनद्वारे रेतीचे उत्खनन केले जात आहे. या नद्यांच्या पात्रात खोल खड्डे तयार झाले असून, या नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. परिणामी, या रेतीउत्खननाला कायमचा आळा घालण्याची मागणी पर्यवरण तज्ज्ञांनी केली आहे.
***
पाटचऱ्या बुजल्याने शेतकरी त्रस्त
रामटेक : तालुक्यातील पेंच प्रकल्पाच्या कालव्यावर पाटचाऱ्यांचे जाळे विणण्यात आले आहे. हल्ली या पाटचऱ्या बुजल्याने त्या साफ करण्याची गरज आहे. सदर कामे उन्हाळ्यात करणे अपेक्षित आहे. मात्र, या कामाला अद्याप सुरुवात करण्यात आली नाही. सदर कामे सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
***