शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: कोरोना लस घेतलेल्यांसाठी महत्वाची बातमी; ज्या लसीचे दोन डोस घेतले, बूस्‍टरही तिचाच घ्यावा लागणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 10:30 IST

गुरुवारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला कोव्हॅक्सीनचे डोस घेतल्यानंतर, कोविशिल्डचा बूस्टर डोस घेतल्यास, 6 ते 10 पट अँटीबॉडी वाढल्याचे दिसून आले आहे...

नवी दिल्‍ली - कोरोना व्हायरसपासून संरक्षणासाठी आपण ज्या कंपनीची लस घेतली असेल, बूस्‍टर डोसही आपल्याला त्याच कंपनीचा घ्यावा लागू शकतो. कारण, सरकार अद्याप दोन वेगवेगळ्या लसींचे मिश्रण करण्यास मंजुरी देण्याच्या विचारात दिसत नाही. खरे तर, सरकार सीएमसी वेल्लोरच्या अध्ययनाच्या आधारे, असा निर्णय घेऊ शकते. यामागचे महत्वाचे कारण म्हणजे, बूस्टर डोससाठी लसींचे मिश्रण करूनही निकालात एकसूत्रता दिसून आलेली नाही.

गुरुवारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला कोव्हॅक्सीनचे डोस घेतल्यानंतर, कोविशिल्डचा बूस्टर डोस घेतल्यास, 6 ते 10 पट अँटीबॉडी वाढल्याचे दिसून आले आहे. असे ख्रिश्चन मेडिकल कॉलेज (CMC) वेल्लोरच्या अध्ययनाची समीक्षा करणाऱ्या एनटीएजीआयच्या कोरोना कार्य समूहाने गेल्या आठवड्यातच म्हटले आहे. एका अधिकृत सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कोविशील्‍डचे दोन डोस घेतल्यानंतर बूस्टर डोस म्हणून, कोव्हॅक्सीनचा डोस दिला असता, असा रिझल्ट दिसून आला नाही. तसेच, या कार्यक्रमासंदर्भातील आव्हाने डोळ्यासमोर ठेवून, यासंदर्भात अंतिम शिफारशीसाठी NTAGI च्या स्थायी तांत्रिक उपसमितीच्या बैठकीत चर्चा केली केली जाईल, असेही सूत्रांनी म्हटले आहे.

बायोलॉजिकल ईचा अर्ज प्रलंबित -सध्या देशात कोरोना लसींचे मिश्रण करण्याची परवानगी नाही. म्हणजेच, लोकांनी ज्या कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना त्याच लसीचा बुस्टर डोस घ्यावा लागणार आहे. यातच, गेल्या चार मेरोजी बायोलॉजिकल ईने भारताच्या औषध नियंत्रकांकडे एक अर्ज करत, कोवीशिल्ड अथवा कोव्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांसाठी, बुस्टर डोस म्हणून, आपल्या 'कोरबेव्हॅक्स' लसीच्या आपतकालीन वापरास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस