महत्वाचे कॉलम न्युज
By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST
सारडा कन्या शाळेत संस्कृत सप्ताह
महत्वाचे कॉलम न्युज
सारडा कन्या शाळेत संस्कृत सप्ताहनाशिक : विद्यार्थिनींमध्ये संस्कृत अध्यायनाची गोडी वाढावी या दृष्टीने सारडा कन्या शाळेत संस्कृत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाअंतर्गत विद्यार्थिनींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.रासबिहारी शिक्षकांची आय. बी. नेटवर्क बैठकनाशिक : रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमधील स्नेहल भावसार आणि शिल्पा दवे या दोन शिक्षकांनी आय. बी. नेटवर्क बैठकीत सहभाग नोंदवला. शिक्षणप्रणालीला व्यासपीठ निर्माण करून देणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता.रासबिहारीत माहिती तंत्रज्ञानावर सत्रनाशिक : रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी माहिती आणि तंत्रज्ञानावर आधारित विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानावर आधारित मार्गदर्शन करण्यात आले.गणेश मंडळांची शांतता समिती बैठकनाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबड पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी गणेश मंडळांना शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर उपस्थित होते.