महत्वाचे... जोड
By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST
अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे रस्त्याचे बांधकाम निकृष्ट
महत्वाचे... जोड
अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे रस्त्याचे बांधकाम निकृष्टकुही : लोकप्रतिनिधींच्या निधीमधून होत असलेल्या तालुक्यातील रस्त्यांच्या बांधकामांकडे संबंधित अभियंत्यांचे दुर्लक्ष सुरू आहे. परिणामी कामाचा दर्जा अतिशय खालावला जात आहे. इस्टिमेटनुसार काम होत नसल्याच्या बाबी पुढे येत आहेत. .....शाळांमध्ये क्रीडांगणांचा अभावनरखेड : शहर व तालुक्यातील अनेक शाळांमध्ये क्रीडांगणांचा अभाव आहे. विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होत आहे. मात्र ग्रामीण भागात क्रीडांगण नसल्याने यावर पाणी फेरले जात असल्याचे दिसते.....अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळाकामठी : आधीच अरुंद रस्ते, त्यावर वाढलेले अतिक्रमण आणि वाहनांची वाढती संख्या अशा स्थितीत शहराची वाहतूक व्यवस्था पूर्णत: बिघडली आहे. लहानसहान कारणांवरून वाहनधारकांत वादाचे प्रमाण वाढले आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे.....पशुपालनासंदर्भातील योजना कागदावरचकळमेश्वर : तालुक्यातील पशुधन घटत आहे, ही चिंतेची बाब आहे. शासनाने पशुपालन व्यवसाय करण्याकरिता अर्थसाहाय्य करणाऱ्या विविध योजना सुरू केल्या आहेत. परंतु त्या योजना केवळ कागदोपत्री असल्याचे वास्तव दिसून येत आहे.