शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

महत्वाचे

By admin | Updated: February 18, 2015 23:54 IST

शिवशक्ती सेवा मंडळातर्फे महाप्रसादाचे वितरण

शिवशक्ती सेवा मंडळातर्फे महाप्रसादाचे वितरण
नागपूर : शिवशक्ती सेवा मंडळाद्वारे कल्याणेश्वर शिवमंदिरात महाशिवरात्रीला प्रसादाचे वितरण करण्यात आले. योगेश त्रिवेदी यांच्या हस्ते कल्याणेश्वर मंदिरात अभिषेक करण्यात आला. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी नगरसेवक गिरीश देशमुख, कुमार मसराम, मनीष मेहाडिया आदी उपस्थित होते.
वसतिगृहातील मुलांची कुष्ठरोग तपासणी
नागपूर : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत नागरी कुष्ठरोग पथकाने कल्पना भवन मुलांचे वसतिगृह, गोरेवाडा येथे विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. संजय मानेकर यांनी विद्यार्थ्यांना कुष्ठरोग व त्वचेच्या आजाराविषयी माहिती दिली. यावेळी राजेंद्र पाटील उपस्थित होते.
माऊंट एव्हरेस्ट शाळा
नागपूर : सेमिनरी हिल्स येथील माऊंट एव्हरेस्ट उच्च प्राथमिक शाळेत आयोजित स्नेहसंमेलनाचे उद्घाटन माजी उपमहापौर संदीप जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका साधना बरडे, देवराव वैद्य, प्रकाश येळणे, जानबा मस्के, श्रीराम बेहरे, जयराम बेहरे, ललिता बेहरे, सारिका ढोमणे, कमला ढोमणे, अनुराधा मोटघरे उपस्थित होते.
कुष्ठरुग्णांना एसटी पास वाटप शिबिर
नागपूर : सहायक संचालक आरोग्य सेवा नागपूरअंतर्गत नागरी कुष्ठरोग केंद्र, शांतिनगर येथे कुष्ठरुग्णांना एसटी पास सवलत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराला डॉ. गरुड, रवींद्र डोळस, डॉ. एस. डब्ल्यू. मानेकर, डॉ. जी. टी. बोरकुटे उपस्थित होते. यावेळी डॉ. मानेकर यांनी शिबिरार्थ्यांना कुष्ठरोगासंदर्भात मार्गदर्शन केले.
संत संमेलनाला सुरुवात
नागपूर : संत श्री गुलाबराव महाराज जीवन शताब्दी महोत्सवानिमित्त हुडकेश्वर येथील रतन मैदानावर आयोजित संत संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. संमेलनात जगतगुरू शंकराचार्य स्वामी नरेंद्रनंद सरस्वती सुमेरपीठ, स्वामी परमानंद महाराज, हरिद्वार, बालसुकस्वरूप चंदनकृष्ण शास्त्री, वृंदावन मार्गदर्शन करणार आहे.
गुरुजींचे जीवन राष्ट्रसमर्पित होते - श्रीधर गाडगे
नागपूर : प्रभात शाखा केळीबाग रोडतर्फे गुरुजींच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रा.स्व.संघाचे नागपूर महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी गुरुजींच्या आठवणींना उजाळा देत त्यांचे जीवन राष्ट्रसमर्पित होते, हा देश वैभवशाली व्हावा यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले.