शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

हातकणंगलेत यड्रावकर गटाच्या भूमिकेला महत्त्व

By admin | Updated: February 3, 2017 00:19 IST

खोची : हातकणंगले तालुक्यात शरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. तालुक्यात कुंभोज, हातकणंगले, रुकडी, कोरोची या चार जिल्हा परिषद मतदारसंघांत त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत या संदर्भातील यड्रावकर गटाची भूमिका बैठक घेऊन स्पष्ट केली जाईल, असे गटांतील विश्वसनीय सूत्रांकडून समजले.

खोची : हातकणंगले तालुक्यात शरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. तालुक्यात कुंभोज, हातकणंगले, रुकडी, कोरोची या चार जिल्हा परिषद मतदारसंघांत त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत या संदर्भातील यड्रावकर गटाची भूमिका बैठक घेऊन स्पष्ट केली जाईल, असे गटांतील विश्वसनीय सूत्रांकडून समजले.
गेल्या दोन ते अडीच दशकांपासून हातकणंगले तालुक्याच्या राजकारणात यड्रावकर गट सक्रीय आहे. हातकणंगले, शिरोळ तालुक्यांत कार्यरत असणारा यड्रावकर उद्योग समूह कार्यकर्त्यांच्या गर्दीने भरलेला आहे. त्यामुळे काही भागात त्यांचा लक्षवेधी प्रभाव आहे. हातकणंगले तालुक्यातील बहुतांशी गावांत त्यांचा स्वतंत्र गट आहे. नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखाना हे त्यांच्या राजकारणातील बैठकीचे प्रमुख केंद्र आहे.
कारखान्यात तालुक्यातील असणारे बहुसंख्य कर्मचारी वरील चार मतदारसंघांतील आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या भूमिकेला महत्त्व आहे. ते राष्ट्रवादीचे नेते आहेत; परंतु त्यांनी हातकणंगले तालुक्यात अद्याप पत्ते खुले केलेले नाहीत. सध्या राष्ट्रवादी पक्ष हातकणंगले तालुक्यात गतिमान झालेला दिसत नाही. शिरोळमध्ये मात्र सक्रीय झालेला आहे. कॉँग्रेस चार व राष्ट्रवादी तीन असे जिल्हा परिषद मतदारसंघ निवडणूक लढविणार आहेत.
हातकणंगलेत मात्र, राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर युती करण्याच्या प्रयत्नात आहे; परंतु युती होताना दिसत नाही. कॉँग्रेस, भाजप, सेना, जनसुराज्य, ताराराणी आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, युवक क्रांती आघाडी, कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी (आवाडे गट) या विविध पक्ष, आघाड्या यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या युती केल्याचे चित्र दिसत आहे. एकूणच गोंधळाची स्थिती पाहावयास मिळत आहे. अशा स्थितीत यड्रावकर गट मात्र जरी राष्ट्रवादीचा असला तरी तो शांतच आहे.
त्यांचे होम पिच शिरोळ तालुका आहे. तरीसुद्धा त्यांनी जर हातकणंगलेत सक्रीय होण्याचा प्रयत्न केला, तर दोन-तीन जिल्हा परिषद मतदारसंघांचा निकाल लावू शकतील, इतका गटाचा प्रभाव आहे. यामध्ये प्रामुख्याने कुंभोज, हातकणंगले, रुकडी, कोरोची या मतदारसंघांचा समावेश आहे. यासंदर्भात यड्रावकर गट लवकरच बैठक घेऊन भूमिका स्पष्ट करेल, असे माहिती गटातील सूत्रांकडून मिळाली.