शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

साखरेवरील आयात शुल्क ४० टक्क्यांवर

By admin | Updated: April 29, 2015 23:25 IST

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या साखर कारखान्यांकडील वाढत्या थकबाकीची कोंडी फोडण्यासाठी केंद्राने बुधवारी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले.

केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी : इथेनॉलवरील उत्पादन शुल्क रद्द; शेतकऱ्यांची थकबाकी अदा करता यावी, यासाठी उपाययोजनानवी दिल्ली : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या साखर कारखान्यांकडील वाढत्या थकबाकीची कोंडी फोडण्यासाठी केंद्राने बुधवारी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. साखरेवरील आयात शुल्क २५ टक्क्यांवरून वाढवून ४० टक्के करण्यात आले, तसेच कारखान्यांना शेतकऱ्यांचे थकीत पैसे देण्यास मदत व्हावी यासाठी इथेनॉलवरील उत्पादन शुल्कही रद्द केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कारखान्यांकडील थकबाकी वाढून २१ हजार कोटी रुपये झाली आहे. मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खुल्या सामान्य परवान्याअंतर्गत साखरेच्या आयातीवरील शुल्क सध्याच्या २५ टक्क्यांवरून वाढवून ४० टक्के करण्यात आले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव आणखी खाली आल्याच्या स्थितीत आयात टाळता येऊ शकेल. सरकारने इंधनात मिसळण्यासाठी पुरविल्या जाणाऱ्या इथेनॉलवरील उत्पादन शुल्कही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या इथेनॉलवर १२.३६ टक्के दराने उत्पादन शुल्क आकारण्यात येते. पुढील साखर हंगामात मळीतून निघणाऱ्या इथेनॉलला उत्पादन शुल्कातून सूट मिळेल. यातून मिळणारा फायदा साखर कारखाने व अंगीकृत मद्यार्क कंपन्यांना दिला जाईल. केंद्राने कापूस विपणन हंगाम २०१४-१५मध्ये ११० लाख गाठी कापसाला हमीदर देण्यासह चालू हंगामात भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि त्याच्या एजंटांच्या कापूस खरेदीतील संभाव्य नुकसानीच्या भरपाईसाठी अतिरिक्त आर्थिक मदत देण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने या आशयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. बैठकीत महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक विपणन महासंघ लि. ला सीसीआयचे उपएजंट म्हणून कापूस खरेदीसाठी पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता देण्यात आली. किमान हमीदर योजनेअंतर्गत कापूस खरेदीची मुख्य जबाबदारी सीसीआयकडे आहे. कापूस विपणन वर्ष २०१४-१५ साठी सामान्य धाग्याच्या कापसाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) ३,७५० रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाचा एमएसपी ४,०५० रुपये ठेवण्यात आला आहे. या निर्णयामुळे २०१४-१५ मध्ये ११० लाख गाठी कापसाला किमान आधारभूत किंमत देता येऊ शकेल, असे सरकारचे म्हणणे आहे.