शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी: तुरळक दगडफेक, हॉटेल कर्मचारी जखमी प्रचंड तणावात शिवाजीरोड अतिक्रमण मुक्त

By admin | Updated: March 23, 2016 00:11 IST

जळगाव : न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करत महापालिकेने शिवाजीरोडवरील फळे विक्रेत्यांची अतिक्रमणे मंगळवारी पोलीस बंदोबस्तात काढली. पोलीस ताफ्यालाही न जुमानता हॉकर्सने आपल्या जागा अडवून ठेवल्याने शेवटी जप्ती कारवाई सुरू झाली. यावर संतप्त होकर्स सैरभैर होऊन पळापळ व तुरळक स्वरूपाची दगडफेक झाली. यात एक हॉटेल कर्मचारी जखमी झाला. या प्रकारामुळे शिवाजीरोड, जुना कापड बाजार परिसर व सुभाष चौकातही काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

जळगाव : न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करत महापालिकेने शिवाजीरोडवरील फळे विक्रेत्यांची अतिक्रमणे मंगळवारी पोलीस बंदोबस्तात काढली. पोलीस ताफ्यालाही न जुमानता हॉकर्सने आपल्या जागा अडवून ठेवल्याने शेवटी जप्ती कारवाई सुरू झाली. यावर संतप्त होकर्स सैरभैर होऊन पळापळ व तुरळक स्वरूपाची दगडफेक झाली. यात एक हॉटेल कर्मचारी जखमी झाला. या प्रकारामुळे शिवाजीरोड, जुना कापड बाजार परिसर व सुभाष चौकातही काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हायकोर्टाच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या संभ्रमामुळे शिवाजीरोडवरील फळविक्रेते व मसाला विक्रेत्या हॉकर्सने सोमवारी पुन्हा शिवाजीरोडवर आपल्या गाड्या लावल्या होत्या. या संदर्भातील चर्चेतून तोडगा न निघाल्याने दुपारी १२.३० वाजेपासून महापालिका आयुक्त संजय कापडणीस, उपायुक्त प्रदीप जगताप, अतिक्रमण अधीक्षक एच.एम.खान, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नवलनाथ तांबे व २० ते २५ पोलिसांचा ताफा असा लवाजमा शिवाजीरोडवर कारवाईसाठी रवाना झाला.
प्रचंड तणावातही चर्चेला प्राधान्य
शिवाजीरोडवर आल्यावर तेथे अधिकारी वर्गाने पुन्हा हॉकर्सशी संवाद साधला मात्र त्यातील काही जण तावातावाने बोलत होते. हेल्मेटधारी अतिक्रमण विभागातील कर्मचारी, लाठ्याकाठ्या घेऊन मैदानात उतरलेले पोलीस असा ताफा असताना हॉकर्स त्यांना जुमानत नव्हते. या दरम्यान गाडीवरून अतिक्रमण काढून बी.जे. मार्केटवरील जागेवर हॉकर्सने जावे असे आवाहनी सुरूच होते.
कारवाईन तणाव व फळे फेकली
समजाविण्याचा प्रयत्न करूनही हॉकर्स ऐकत नसल्याने अखेर जप्तीच्या कारवाईला सुरुवात झाली. यामुळे हॉकर्स सैरभैर झाले. काहींनी आरडाओरड करत फळे फेकण्यास सुरुवात केली. संपूर्ण रस्त्यावर प्रचंड आरडाओरड करत हॉकर्स पळत होते. बाजारात आलेले नागरिकही यामुळे भीतीने पळायला लागले. या भागातील दुकानेही पटापट बंद झाली. आंबेडकर मार्केटच्या मागील गल्लीकडे व जुना कापड बाजार रोडकडे हॉकर्स पळायला लागले. त्यांच्यामागे पोलीसही होते. यामुळे सुभाष चौकाकडेही पळापळ सुरू झाली. जुना कापड बाजार रस्त्यावरील दुकानेही यामुळे बंद झाली.