शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 06:07 IST

सर्व संसद सदस्यांना वॉशिंग्टनमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन

वॉशिंग्टन : अमेरिकी संसदेत ट्रम्प समर्थकांनी घातलेल्या राड्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकीर्दीला आता अवघे काही दिवसच शिल्लक असताना त्यांच्यावर महाभियोगाची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी सर्व संसद सदस्यांनी या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. 

गेल्या आठवड्यात संसदेत नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या निवडीची औपचारिकता सुरू असताना ट्रम्प समर्थकांनी संसदेवर हल्लाबोल केला. यावेळी झालेल्या हिंसाचारात पाच जण ठार झाले. त्यात एका पोलिसाचाही समावेश होता.

उर्वरित दिवसही अध्यक्षपदी ठेवणे धोक्याचे अमेरिकी संसदेवर ट्रम्प समर्थकांनी केलेल्या या हल्ल्याचे सर्वदूर  पडसाद उमटले. ट्रम्प यांना उर्वरित दिवसही अध्यक्षपदी ठेवणे  धोक्याचे असून त्यांच्यावर महाभियोगाची कारवाई केली जावी, अशी मागणी  जोर धरू लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नॅन्सी पेलोसी यांनी या आठवड्यात सर्व संसद सदस्यांनी राजधानी वॉशिंग्टन येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले.  ट्रम्प यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी त्यांच्यावर दडपण आणले जाणार आहे. त्यांनी या दडपणाला थारा न दिल्यास ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई केली जाऊ शकते, त्यासाठी सर्व संसद सदस्यांनी राजधानीत उपस्थित राहणे गरजेचे आहे, असे पेलोसी यांनी स्पष्ट केले. २० जानेवारी रोजी ट्रम्प यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे.  

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पInternationalआंतरराष्ट्रीय