नझुल अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करा
By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST
नझुल अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करा
नझुल अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करा
नझुल अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करा सिंधी समाजाच्या शिष्टमंडळाची मागणी : लीज पट्ट्याची कामे रखडली नागपूर : नझुल अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली नसल्याने विस्थापित सिंधी समाजबांधवांच्या लीज पट्टे वितरणाचे काम रखडले आहे. तेव्हा राज्य सरकारने नझुल अधिकाऱ्यांची नियुक्ती तातडीने करावी, अशी मागणी नगरसेवक प्रकाश तोतवानी यांच्या नेतृत्वातील सिंधी समाजबांधवांच्या शिष्टमंडळातर्फे उपजिल्हाधिकारी संगीतराव यांची भेट घेऊन चर्चेदरम्यान केली. खामला सिंधी कॉलनी येथील १२५ समाजबांधवांना अजूनपर्यंत लीज पट्टे मिळालेले नाही. त्यासंदर्भात शिष्टमंडळ उपजिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले होते. तेव्हा नझुल अधिकारी नसल्याने पट्टे वितरणाचे काम रखडले असल्याचे उघडकीस आले. त्यावर शिष्टमंडळाने उपरोक्त मागणी केली. शिष्टमंडळात परमानंद शंभुवानी, नारायण भोजवानी, राजन रामचंदानी, श्रीकांत भोरे, उमेश देशमुख आदींचा समावेश होता. बॉक्स..किमान ५०० रुपये संपत्ती कर भरावा लागणार नागपूर शहराच्या सीमेअंतर्गत येणाऱ्या कुठल्याही संपत्तीवर आता कमीतकमी ५०० रुपये कर भरावा लागेल. यासाठी महानगरपालिकेच्या १६ फेब्रुवारी रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत कर विभागातर्फे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेने यापूर्वीच संपत्ती कर सीमा किमान ५५० रुपये निश्चित केली आहे. हा धोरणात्मक निर्णय असल्याने सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी आणला जाणार आहे.