शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘तंबाखूच्या विक्रीवर त्वरित बंदी आणा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 01:34 IST

गुटखा, पान मसाला, खैनी यासारख्या चघळण्याच्या तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाने २३ सप्टेंबर २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या बंदीची त्वरित अंमलबजावणी करा, अशी मागणी कर्करोगतज्ज्ञांना केंद्र सरकारला केली आहे.

कोलकाता : गुटखा, पान मसाला, खैनी यासारख्या चघळण्याच्या तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाने २३ सप्टेंबर २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या बंदीची त्वरित अंमलबजावणी करा, अशी मागणी कर्करोगतज्ज्ञांना केंद्र सरकारला केली आहे.तोंडाचा कर्करोग होण्याच्या नव्वद टक्के घटना चघळण्याच्या तंबाखुजन्य पदार्थांमुळे होतात यावर कर्करोगतज्ज्ञांचे एकमत आहे. सर्वोच्च न्यायालयाने या पदार्थांवर घातलेल्या बंदीचा निर्णय सरकारने अमलात आणला तर तोंडाच्या कर्करोगाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवता येईल असे कर्करोगतज्ज्ञांनी म्हटले आहे. कर्करोगतज्ज्ञ डॉ. सौरव दत्ता यांनी म्हणाले तंबाखुमुळे दरवर्षी १० लाख लोक मरण पावतात. त्यामुळे तंबाखुजन्य पदार्थांच्या सर्रास विक्रीवर बंदी आणली पाहिजे.घरातील माणसाच्या कर्करोगाने बळी गेल्याने कुटुंबाची घडी विस्कळीत होते. लाखो कुटुंबे त्यामुळे उद््ध्वस्त झाली आहेत. तंबाखुचा वापर कमी झाल्यास यावर नियंत्रण मिळविता येईल असे माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी म्हणाले.संबंध हेल्थ फाऊंडेशनचे विश्वस्त संजय शेठ यांनी सांगितले की, भारतामध्ये २६.७ कोटी लोक तंबाखुजन्य पदार्थांचा वापर करतात असा गेल्या वर्षी करण्यात आलेल्या ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे. दररोज ५५०० मुले तंबाखुजन्य पदार्थ वापरतात. तंबाखुचा वापर करणाºयांपैकी दोन तृतीयांश लोक अकाली मरण पावतात असेही या सर्वेक्षणातील निष्कर्षांत म्हटले आहे. (वृत्तसंस्था)>तंबाखूवर नियंत्रण हवेएड्स, मलेरिया, टीबी या रोगांपेक्षा कर्करोगाने मरण पावणाºयांची संख्या अधिक आहे. याचा विचार करुन तंबाखुचे पीक घेण्यावरही केंद्र सरकारने नियंत्रण राखण्याची वेळ आली आहे. तंबाखुचे पीक कमी केल्याने जे नुकसान होईल, त्याची भरपाई अन्य मार्गांनी करता येईल, असेही त्रिवेदी म्हणाले.