शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

RSS प्रमुख मोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमाम इलियासी यांना Y+ श्रेणीची सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 14:15 IST

केंद्र सरकारने अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख डॉ. उमर अहमद इलियासी यांना Y+ श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली: केंद्र सरकारने अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख डॉ. उमर अहमद इलियासी यांना Y+ श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. अहमद इलियासी यांना सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत असताना केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात डॉ. उमर अहमद इलियासी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांची नवी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीत भेट घेतली आणि त्यांना 'राष्ट्रपिता' म्हटले होते. इलियासी यांच्या या वक्तव्यावर अनेक मुस्लिम संघटना संतप्त झाल्या आहेत.

डॉ. उमर अहमद इलियासी यांनी सांगितले की, 'मला 22 सप्टेंबरपासून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. देशाचे वातावरण बिघडवणारे, माझा शिरच्छेद करण्याच्या धमक्या देत आहेत. सोशल मीडियावरुनही मला सतत धमक्या येत आहेत.' 22 सप्टेंबर रोजी मोहन भागवत यांनी उमर अहमद इलियासी यांची दिल्लीतील मशिदीत भेट घेतली होती. त्या बैठकीत मुस्लिम समाजातील अनेक नेतेही उपस्थित होते.

काय म्हणाले होते इलियासी?डॉ. उमर अहमद इलियासी यांनी भागवत यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांना सांगितले होते की, 'भागवत आमच्या मशिदीत येणे, ही भाग्याची गोष्ट आहे. भागवत आपल्या राष्ट्राचे पिता आणि राष्ट्रऋषी आहेत. देशाची एकता आणि अखंडता कायम राहिली पाहिजे. आपल्या सर्वांच्या उपासनेचे वेगवेगळे मार्ग असू शकतात, पण त्यापूर्वी आपण सर्व मानव आहोत आणि मानवता आपल्यामध्ये राहिली पाहिजे. आपण भारतात राहतो, म्हणून आपण भारतीय आहोत.'

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ