शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मी ब्लू व्हेलच्या जाळ्यात अडकलो आहे, मला वाचवा! तामिळनाडूतील मुलाचा हेल्पलाइनवर आला फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 06:30 IST

ब्लू व्हेल या आॅनलाइन खेळाच्या जाळ्यात अडकलेल्या मुलांची संख्या मोठी नसली तरी धोके लक्षात येऊ लागल्याने मुले त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली आहेत.

चेन्नई : ब्लू व्हेल या आॅनलाइन खेळाच्या जाळ्यात अडकलेल्या मुलांची संख्या मोठी नसली तरी धोके लक्षात येऊ लागल्याने मुले त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली आहेत. तामिळनाडूच्या तिरूपूर शहरातील १२ वर्षांच्या एका मुलाने राज्याच्या १0४ या हेल्पलाइन क्रमांकावर, आपण ब्लू व्हेलच्या जाळ्यात अडकलो आहोत, मला वाचवा, असा फोन केला.मुलाने फोन करून, समुपदेशकाला सांगितले की, ते लोक मला आणि माझ्या कुटुंबीयांना मारून टाकतील. सुरुवातीला हा मुलगा फारशी माहिती द्यायला तयार नव्हता. मात्र आपण ब्लू व्हेल खेळत होतो, हे मान्य करून, त्यातून आपल्याला बाहेर पडायचे आहे, असे फोनवर सांगितले.स्नेहा या आत्महत्या प्रतिबंधक केंद्राच्या संस्थापिका डॉ. लक्ष्मी विजयकुमार म्हणाल्या की, या धोकादायक खेळामुळे मुलांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात आल्यामुळे या खेळात अडकलेली काही मुले त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागली आहेत. अनेक मुले या खेळातून बाहेर पडताना घाबरतात. खेळ सोडल्यास, त्यांचे आई-वडिल, बहिण वा भावाला मारण्यात येईल, अशी धमकी दिली जाते, हे त्याचे कारण आहे.सुरुवातीला एक आव्हान म्हणून ब्लू व्हेल खेळण्यास सुरुवात करणारी मुले खेळाच्या एका विशिष्ट टप्प्यावर स्वत:चे आयुष्य संपवण्यास तयार होत असल्याने त्या खेळाच्या लिंक देऊ नयेत, असे केंद्र सरकारने आधीच संबंधितांना (फेसबुक, गूगल, व्हॉट्सअ‍ॅप आदी) सांगितले आहे. (वृत्तसंस्था)काय असते ब्ल्यू व्हेल चॅलेंज?ब्लू व्हेल हा व्हिडीओ गेम असून २0१३ साली रशियात त्याची सुरुवात झाली. तो खेळणाºयाला 50 आव्हाने (चॅलेंजेस) दिली जातात. आव्हाने ५0 दिवसांत पूर्ण करायची असतात. आधी सोपी व नंतर नंतर कठीण आव्हाने दिली जातात. त्यात हाताच्या नसा कापणे, जनावराला मारणे व अंतिम टप्प्यात आत्महत्या करायला सांगणे आदींचा समावेश असतो. प्रत्येक आव्हान पूर्ण केल्यानंतर ते चित्रण गेमच्या क्युरेटरला पाठवायचे असते. अखेर सहभागींना आत्महत्या करण्याचे आव्हान दिले जाते.

टॅग्स :Blue Whaleब्लू व्हेल