हरयाणामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रोहतकमधील महर्षी दयानंद विद्यापीठात महिला स्वच्छता कर्मचाऱ्या आणि अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला. मासिक पाळीमुळे प्रकृती बिघडल्याचे कारण देत, दोन महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पर्यवेक्षकांना सुट्टी मागितली होती. यावेळी पर्यवेक्षकाने त्यांना कपडे काढून मासिक पाळीची तपासणी करण्यास सांगितले. यामुळे मोठा गोंधळ झाला.
वाद वाढत असताना, विद्यार्थी संघटनांनीही स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ पुढाकार घेतला. सुपरवायझरांना निलंबित करण्याची मागणी केली. विद्यापीठ प्रशासनावर वाढत्या दबावानंतर, त्या सुपवायझरला काढून टाकण्यात आले.
चौकशीसाठी महिला कर्मचाऱ्यांचे कपडे काढून फोटो काढण्यास सांगितले
दोन महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मासिक पाळीमुळे ब्रेक हवा असल्याचे सुपरवायझरला सांगितले. यावेळी मोठा वाद सुरू झाला. त्याने समस्या समजून घेण्याऐवजी शिवीगाळ केली, असा आरोप महिलांनी केला. त्याने एका महिला सुरक्षा रक्षकाच्या माध्यमातून महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना कपडे काढून तपासणी करण्यास सांगितले. महिलेने नकार दिल्यावर तिला मारहाण करण्यात आली. सुपरवायझरने तिला कपडे काढून तपासणीसाठी फोटो काढण्यास सांगितले. त्यानंतर इतर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. यावेळी विद्यापीठात मोठा गोंधळ सुरू झाला.
कठोर कारवाई केली जाणार- कुलसचिव
वाद वाढल्यानंतर विद्यापीठाचे कुलसचिव केके गुप्ता घटनास्थळी आले. त्यांनी विद्यापीठात महिलांविरुद्ध होणाऱ्या कोणत्याही गैरप्रकारांची चौकशी केली जाईल असे सांगितले. पर्यवेक्षकांना काढून टाकण्यात आले आहे आणि या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही.
Web Summary : Haryana University supervisor demanded female staff remove clothes for period check. Protests erupted, leading to supervisor's removal. University promises thorough investigation and strict action against culprits.
Web Summary : हरियाणा विश्वविद्यालय के सुपरवाइजर ने महिला कर्मचारियों को मासिक धर्म की जांच के लिए कपड़े उतारने को कहा। विरोध प्रदर्शन हुआ, जिसके कारण सुपरवाइजर को हटा दिया गया। विश्वविद्यालय ने जांच का वादा किया है।