शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राम रहिमच्या डेऱ्यात आढळला फटाक्यांचा अवैध कारखाना; पोलिसांनी ठोकलं टाळं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 13:27 IST

डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात अवैध फटाक्यांचा कारखाना तपास पथकाला आढळून आला आहे.

ठळक मुद्देडेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात अवैध फटाक्यांचा कारखाना तपास पथकाला आढळून आला आहे. कारखान्याला पोलिसांनी टाळं ठोकलं असून त्यातील स्फोटकं आणि फटाके ताब्यात घेतले आहेत. डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयाची निमलष्करी दल आणि हरयाणा पोलिसांनी तपासणी सुरू केली आहे.

सिरसा, दि. 9- बलात्कार प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या बाबा राम रहिमच्या सिरसातील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात सध्या सुरू असलेल्या सर्च ऑपरेशन दरम्यान अनेक महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती उघड होते आहेत. तसंच सगळ्यांनाच थक्क करणारी राम रहिमची मालमत्तासुद्धा सापडते आहे. डेरातून अशीच रहस्य समोर येत असताना आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात अवैध फटाक्यांचा कारखाना तपास पथकाला आढळून आला आहे. या कारखान्याला पोलिसांनी टाळं ठोकलं असून त्यातील स्फोटकं आणि फटाके ताब्यात घेतले आहेत.

बलात्कार प्रकरणात जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या बाबा राम रहिमच्या डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयाची निमलष्करी दल आणि हरयाणा पोलिसांनी तपासणी सुरू केली आहे. या सर्च ऑपरेशनचा आजचा दुसरा दिवस आहे. शुक्रवारी दिवसभर झालेल्या सर्च ऑपरेशनमध्ये रोख रकमेसह अनेक महागड्या वस्तू या मुख्यालयात सापडल्या. आजच्या दुसऱ्या दिवशीही तपासणी सुरू आहे. मुख्यालयात स्फोटकं आणि फटाक्यांचा कारखाना आढळून आला आहे. पोलिसांनी कारखान्याला टाळं ठोकलं आहे. तसंच पोलिसांनी तीन अनुयायांना अटक केली आहे. ५ कोटी खर्च करून हिंसा भडकवण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. चमकौर सिंह, कर्मजीत आणि दानसिंह अशी त्यांची नावं आहेत. डेरा पंचकुला शाखेचा प्रमुख असलेला चमकौर सिंह हा मुख्य आरोपी असल्याचं बोललं जात आहे.

डेरा सच्चा सौदामध्ये सर्च ऑपरेशन दरम्यान फटाक्यांचा कारखाना आढळला असून तो बेकायदेशी आहे, असं राज्य माहिती आणि जनसंपर्क विभागाचे उपसंचालक सतीश मेहरा यांनी सांगितलं. सतीश मेहरा यांना  प्रसारमाध्यमांशी बोलण्यासाठी प्रशासनाने अधिकृतरीत्या परवानगी दिली आहे. तो बेकायदेशीर कारखान सील करण्यात आल्याचंही मेहरा यांनी सांगितलं आहे.

डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात शुक्रवारी दिवसभरात झडती घेतल्यानंतर शनिवारी म्हणजेच सर्च ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच तपासणीला पुन्हा सुरुवात झाली. पंजाबमधून बोलावण्यात आलेल्या १४ लोहारांनी मुख्यालयातील कार्यालयांचे टाळे तोडले. या मुख्यालयात अवैध फटाक्यांचा कारखाना असल्याचं आढळून आले. हा कारखान्याला पोलिसांनी टाळं ठोकलं आहे. या कारखान्यात स्फोटकंही सापडली. मिळालेल्या माहितीनुसार, राम रहिम ज्या ठिकाणी ध्यानधारणेला बसायचा त्या ठिकाणचं खोदकाम सुरू झालं आहे. जेसीबीच्या मदतीने खोदकाम सुरू करण्यात आलं आहे.तसंच कार्यालयातून मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. एका व्यक्तीलाही ताब्यात घेतलं आहे. हा अनुयायी असून झडतीदरम्यान मोबाईल फोनमध्ये त्याचं चित्रण करत होता, अशी माहिती समोर येते आहे. 

शुक्रवारी डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयातून शुक्रवारी सापडल्या या वस्तूराम रहिमच्या तब्बल ८00 एकरात वसलेल्या ‘डेरा सच्चा सौदा’च्या मुख्यालयाची सशस्त्र सुरक्षा दलाचे जवान व पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झाडाझडती घेतली आणि नोंदणी न झालेल्या असंख्य लक्झरी व मॉडिफाइड कार्स, चलनातून बाद झालेल्या नोटा, अनेक लॅपटॉप व कॉम्प्युटर्स, हार्ड डिस्क्स, कसलीही लेबल नसलेली औषधं आदी साहित्य जप्त केलं. शाळा, महाविद्यालय, अम्युजमेंट पार्क, मॉल, दुकाने, रुग्णालय याबरोबरच मसाला बनवण्याची फॅक्टरी, चित्रपटगृह असल्याचं आढळून आलं. याशिवाय राम रहीमच्या गुहेकडे जाणारा गुप्त मार्ग शोधण्यात आला. तेथे अनेक एकरांवर सेंद्रिय शेती होते. आतमध्ये हजारांहून अधिक मजूर व कामगार आतापर्यंत काम करीत होते.या सर्च ऑपरेशनमध्ये येथील काही खोल्या सील करण्यात आल्या आहेत. ओबी व्हॅन, हजार रुपयांच्या ७००० बाद झालेल्या नोटा, १२ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. कर्नाल आणि सोनिपत येथून न्यायवैद्यक पथक दाखल झाले होते. न्यायवैद्यक तज्ज्ञांना उत्तराखंडातून बोलाविण्यात आले होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. के. एस. पवार यांच्या देखरेखीखाली या तपासाची व्हिडीओग्राफी आणि निरीक्षण केलं जात आहे. 

टॅग्स :Gurmeet Ram Rahimगुरमीत राम रहीमDera Saccha Saudaडेरा सच्चा सौदाMSGमेसेंजर ऑफ गॉड