शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पंचगव्यावरील संशोधनासाठी आयआयटी दिल्लीकडे 50 प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 14:55 IST

पंचगव्यावर संशोधन करण्यासाठी देशभरातील 50 संशोधन संस्थांनी आयआयटी दिल्लीकडे आपले प्रस्ताव पाठवले आहेत. स्वरुप संशोधन प्रकल्पाअंतर्गत हे संशोधन येते.

ठळक मुद्देस्वरुप हा प्रकल्प (सायंटिफिक व्हॅलिडेशन अॅंड रिसर्च ऑन पंचगव्य) खास गायीपासून मिळणाऱ्या उत्पादनांच्या संशोधनासाठी तयार सुरु करण्यात आलेला आहे. पंचगव्यामध्ये गायीचे दूध, दही, गोमय, गोमूत्र आणि तूप यांचा समावेश होतो.

नवी दिल्ली, दि.3- पंचगव्यावर संशोधन करण्यासाठी देशभरातील 50 संशोधन संस्थांनी आयआयटी दिल्लीकडे आपले प्रस्ताव पाठवले आहेत. स्वरुप संशोधन प्रकल्पाअंतर्गत हे संशोधन येते. स्वरुप हा प्रकल्प (सायंटिफिक व्हॅलिडेशन अॅंड रिसर्च ऑन पंचगव्य) खास गायीपासून मिळणाऱ्या उत्पादनांच्या संशोधनासाठी तयार सुरु करण्यात आलेला आहे. पंचगव्यामध्ये गायीचे दूध, दही, गोमय, गोमूत्र आणि तूप यांचा समावेश होतो.

आम्हाला सीएसआयआर प्रयोगशाळा, एनआयटी, आयआयटी अशा संस्थांकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. अद्याप कोणत्याही संशोधन प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली नाही असे आयआयटी दिल्लीच्या ग्रामविकास आणि तंत्रज्ञान विभागाच्या व्ही. के विजय यांनी स्पष्ट केले आहे.  मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये आयआयटी दिल्लीमध्ये स्वरुप वरती विचारमंथन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पंचगव्याचा शेती, कुपोषण, साबण-डासप्रतिबंधक औषधांसारखी ग्राहकोपयोगी उत्पादनांसाठी कसा उपयोग होईल यावर चर्चा करण्यात आली होती. आता भारतीय गायींचे वेगळेपण आणि परदेशी गायींच्या तुलनेमध्ये त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पादनांची उपयुक्तता याचा अभ्यास करण्याचा विचार सरकारचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

एप्रिल महिन्यामध्ये केंद्र सरकारने स्वरुप समितीची स्थापना केली. यामध्ये केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांची अध्यक्षस्थानी नेमणूक करण्यात आली. समितीच्या इतर सदस्यांमध्ये सीएसआयआरचे माजी महासंचालक रघुनाथ माशेलकर तसेच सीएसआयआर, आयसीएआर,आयसीएमआरचे सध्याचे संचालक, विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव आणि एनजीओंचा समावेश आहे.

गो-तस्कर समजून 4 जणांना अमानुष मारहाण 

 मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील डुलारिया गावात स्वयंघोषित गोरक्षकांनी गो-तस्कर समजून 4 युवकांना कथित स्वरुपात भररस्त्यात लाथा-बुक्क्या घालून बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियादेखील व्हायरल झाला आहे.  पोलिसांनी सांगितले की, ज्यांच्यावर गो-तस्करीचा आरोप करण्यात आला आहे त्या चार जणांनाही ताब्यात घेण्यात आले आहेत. मात्र या चार जणांवर हल्ला करणारे फरार झाले आहेत. गेल्या आठवड्यात ही घटना घडली आहे. स्वंयघोषित गो-रक्षकांद्वारे या युवकांना बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. यानंतर दोन्ही गटांविरोधात पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या चारही युवकांना बांधून स्वयंघोषित गोरक्षकांनी सर्वांसमोर त्यांना अमानुष मारहाण केली. मारहाण करताना या युवकांना उठाबशांची शिक्षाही देण्यात आली होती.