शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

तृतीय पंथी विद्यार्थ्यांना IGNOU देणार मोफत शिक्षण

By admin | Updated: July 4, 2017 12:29 IST

तृतीय पंथी विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी मोफत शिक्षण देणार आहे.

ऑनलाइन लोकमत

लखनऊ, दि. 4- तृतीय पंथी विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी मोफत शिक्षण देणार आहे. तृतीय पंथी विद्यार्थ्यांनाही शिक्षणाचा हक्क मिळावा तसंच उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना मार्ग मोकळा व्हावा, यासाठी "इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीने  देशातील सगळ्या तृतीय पंथी विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्णपणे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. द टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. या निर्णयानुसार देशभरात असलेल्या इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीच्या सर्व केंद्रांमध्ये ही सुविधा दिली जाणार आहे. 
 
तृतीय पंथियांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यासाठी आम्ही काही तृतीय पंथी कार्यकर्त्यांची मदत घेतली आहे. किमान पाच जणांचं यावेळी युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षणासाठी नोंद करण्याचं आमचं ध्येय आहे, असं इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीचे लखनऊमधील विभागीय संचालक मनोरमा सिंह यांनी सांगितलं आहे. या जुलै महिन्यापासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सर्टिफिकेट अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ जुलै असून इतर अभ्यासक्रमांसाठी ती ३१ जुलै अशी आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनूसार, कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये तृतीय पंथी विद्यार्थ्यांसाठी क्वचितच पूर्ण वेळ बॅचलर कोर्स असतात. प्रवेश अर्जात जरी तृतीय पंथींसाठी वेगळी कॅटेगरी असली तरीही कागदपत्रांच्या अभावामुळे त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश दिला जात नाही. इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमध्ये जे तृतीय पंथी विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करतील त्यांना प्रवेशासाठी कोणतंही ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा स्थलांतराचं सर्टिफिकेट सादर करावं लागणार नाही. युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेताना त्यांची ओळख आधारकार्ड, राज्य किंवा केंद्र सरकारकडून दिलेलं एखाद प्रमाणपत्र किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याकडून दिलेल्या प्रमाणपत्रावर तपासली जाणार आहे. 
 
"इतर विद्यार्थ्यांप्रमाणे तृतीय पंथी विद्यार्थीसुद्धा त्यांना आवड असणाऱा कोर्स निवडू शकतात, तसंच त्यांना यासाठी युनिव्हर्सिटीकडून सर्वोतोपरी मदर केली जाइल, असं इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीचे लखनऊमधील विभागीय संचालक मनोरमा सिंह यांनी सांगितलं आहे. या युनिव्हर्सिटीमध्ये मानसशास्त्र, समाजशास्त्र, विज्ञान, पर्यटन, व्यवस्थापन, शिक्षण अशा विविध विषयांमध्ये 228 अॅकेडमिक आणि प्रोफेशनल कोर्स चालतात.