शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सिडनीची पुनरावृत्ती रोखायची असल्यास अन्य धर्मीयांना हिंदू बनवा - निलेश राणे

By admin | Updated: December 17, 2014 14:28 IST

सिडनीतील दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती रोखायची असल्यास अधिकाधिक लोकांचे धर्मांतर करून त्यांना हिंदू धर्मात आणा' असे वादग्रस्त ट्विट काँग्रेस नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १७ - सिडनीतील कॅफेमधील ओलीस नाट्य यामुळे संपूर्ण जगाचा थरकाप उडालेला असतानाच 'सिडनीतील दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती रोखायची असेल तर भारतातील अधिकाधिक लोकांचे धर्मांतर करून त्यांना हिंदू धर्मात आणायला हवे' असे ट्विट काँग्रेस नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी केले आहे. मात्र हे आपले वैयक्तिक मत आहे पक्षाची भूमिका नव्हे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आग्र्यातील कथित धर्मांतराच्या मुद्यावरून सध्या देशभरात गदारोळ माजलेला असतानाचा राणे यांच्या या ट्विटमुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. 
'ऑस्ट्रेलियात हल्ल्याची जी घटना घडली ती जगभरात सर्वत्र घडताना दिसत असून त्याची पुनरावृत्ती रोखायची असल्यास अधिकाधिक लोकांना हिंदू धर्मात आणण्याचा कार्यक्रम भारताने हाती घ्यायला हवा' असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तीन दिवसांपूर्वी सिडनीत रंगलेल्या ओलीस नाट्यात एका दहशतवाद्यासह दोन निष्पाप नागरिकही ठार झाले होते. 
एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना राणे यांनी उत्तर प्रदेशमधील सामूहिक धर्मांतराचे समर्थनच केले आहे. ' गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये  जे घडत आहे, त्यात काहीच चुकीचे नाही.  बंदुकीच्या धाकावर धर्मपरिवर्तन करणे चुकीचे अाहे, परंतु जर धर्मांतर करून हिंदू धर्मात स्वेच्छेने अन्य धर्मीय येत असतील तर त्यांना प्रवेश देण्यात यावा, त्यात काही गैर नाही, असे त्यांनी म्हटले आहे. ' अन्य कोणत्याही धर्मापेक्षा हिंदू धर्म दहशतवादाचा सामना सामना अधिक मजबुतीने करू शकतो. मी एका हिंदू कुटुंबात जन्माला आलो आहे.  हिंदूंच्या भल्यासाठीच मी हे विचार मांडत आहे. एखाद्या हिंदूने दुस-या व्यक्तीवर हल्ला केल्याचे मी आत्तापर्यंत कधीच ऐकलेले नाही. मी कोणत्याही जाती- धर्माच्या विरोधात नाहीये, पण सर्व हिंदू जर एकत्र आले तर दहशतवाद्यांना कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी अनेकवेळा विचार करावा लागेल,' असेही निलेश यांनी म्हटले आहे. 
दरम्यान पेशावरमधील शाळेतील हल्ल्याचा त्यांनी जोरदार निषेध करत तालिबानाचा समूळ नायनाट करण्याची वेळ आली आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.